‘शेडनेट, पॉलीहाऊसद्वारे करा किफायतशीर शेती’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

एसआयएलसीतर्फे १० मार्चला कोल्हापुरात प्रमाणपत्र प्रशिक्षण, अनुभवी तज्ज्ञांद्वारे होणार मार्गदर्शन 

कोल्हापूर - ऊन, वारा, पाऊस, वादळ, कीड-रोगांपासून संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेट, पॉलीहाऊस तंत्राचा वापर फायदेशीर ठरणारा आहे.

एसआयएलसीतर्फे १० मार्चला कोल्हापुरात प्रमाणपत्र प्रशिक्षण, अनुभवी तज्ज्ञांद्वारे होणार मार्गदर्शन 

कोल्हापूर - ऊन, वारा, पाऊस, वादळ, कीड-रोगांपासून संरक्षित शेती करण्यासाठी शेडनेट, पॉलीहाऊस तंत्राचा वापर फायदेशीर ठरणारा आहे.

याद्वारे पिके संरक्षित वातावरणात लागवड करता येऊन चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळू शकते. अशा या फायदेशीर शेडनेट, पॉलीहाऊसच्या उभारणीपासून ते त्यात लागवड करावयाच्या भाजीपाला, फूलपिकांच्या व्यवस्थापनाची इत्थंभूत माहिती करून देणारे ‘शेडनेट व पॉलीहाऊसमधील शेती’ विषयाचे दोन दिवसीय प्रशिक्षण ‘सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर’च्या वतीने ता. १० आणि ११ मार्च रोजी कोल्हापूर, सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. 

तीव्र सूर्यप्रकाश, उष्ण-थंड वारे, धुके, पाऊस, गारपीट, रोग-किडी आणि पक्ष्यांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेडनेट, पॉलीहाऊस तंत्रज्ञान फायद्याचे आहे. प्रशिक्षणात अनेक वर्षांपासून शेडनेट, पॉलीहाऊसमध्ये प्रॅक्टिकल अनुभव असलेले तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 

तसेच शिवारफेरीत पॉलीहाऊसमधील शेती अभ्यासण्याची संधीदेखील आहे. प्रति व्यक्ती तीन हजार रुपये शुल्क आहे. यात चहा, नाश्‍ता, जेवण, प्रशिक्षण साहित्याचा समावेश असून प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिले जाईल. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. 
अधिक माहितीसाठी संपर्क ः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर. 

प्रशिक्षणातील विषय
शेडनेट, पॉलीहाऊस तंत्रज्ञानाचे फायदे 
जागेची निवड, उभारणीचे निकष 
शेडनेट, पॉलीहाऊस उभारणीसाठी येणारा खर्च 
विविध आकारांचे आधुनिक मॉडेल्स 
भाजीपाला, फूलपिकांची लागवड 
खत, पाणी, कीड-रोग व्यवस्थापन 
शासकीय योजना, अनुदान, बॅंक फायनान्स 

प्रशिक्षण तारीख - ता. १० आणि ११ मार्च  
शुल्क - प्रति व्यक्ती तीन हजार रुपये 
प्रवेश - फक्त ४० व्यक्तींसाठी
ठिकाण - सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर 
संपर्क -  ८६०५६९९००७