सुभाष देशमुखच डल्ले मारत फिरतायेत - अजितदादा पवार

Ajit Pawar Criticized Subhash Deshmukh On Corruption
Ajit Pawar Criticized Subhash Deshmukh On Corruption

सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख स्वत:च डल्ले मारत फिरत असून आम्हालाच डल्ल्याची भाषा सांगतात. स्वत: अग्निशमन दलाच्या जागेवर बंगला बांधला. लोकमंगलचे पैसे मध्यंतरी सापडले, त्याचे उत्तर अद्याप दिले नाही अशी जोरदार टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या टिकेबाबत बोलताना शिवसेनेला गांडुळाची टीका झोंबल्याने त्यांची मळमळ बाहेर आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या श्री. पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमवेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "लोकशाहीत पत्रकारांची भूमिका महत्वाची आहे. परंतू पत्रकार चुकला की त्याला शिक्षा करण्याचा आणि पत्रकारीता रद्द करण्याची भूमिका सरकारने मांडली. परंतू त्याविरोधात आवाज उठल्यानंतर ते 'बॅकफूट' गेले. आम्ही सत्तेत असताना विरोधकांच्या बैठकीला पोलिसांना पाठवले नाही. परंतू आज या सभागृहात 'एसआयडी', गुप्तवार्ताचे पोलिस आहेत. आम्ही पत्रकार परिषद बोलवली असताना पोलिस इथे का आले? देशातील जनता हुशार आहे. त्यांच्यावर बंधने आणण्याचा प्रयत्न केला तर ती मान्य करत नाही. आणीबाणी किंवा त्यानंतरच्या काळात हे स्पष्ट झाले आहे. जनता सर्व न्याहाळत असते वेळ आली की बटण दाबून उत्तर देते.'' 

शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हटल्यानंतर त्यांनी केलेल्या टिकेबाबत छेडले असता श्री. पवार म्हणाले, "शिवसेनेला गांडूळ म्हटल्यामुळे चांगलेच लागलेले दिसते. त्यामुळे एखाद्याने पोटातले सर्व बाहेर टाकावे, त्याप्रमाणे टीका केली आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता जनता निर्णय घेईल आमचे खरे की त्यांचे.'' चहा घोटाळ्याच्या आरोपावर सहकारमंत्री देशमुख हे विरोधकांनी देखील चहा पिला असे उत्तर देतात? असे विचारल्यानंतर श्री. पवार म्हणाले, "त्यांचे सरकार सत्तेत आल्यापासून आम्ही चहापानालाच विरोध केला आहे. त्यामुळे चहापानाला गेलो असे ते म्हणत असतील तर फोटोसह पुरावा द्यावा. आमच्यावर डल्ला मारण्याचा आरोप करणारे पालकमंत्री देशमुख हेच डल्ले मारत फिरत आहेत. अग्निशमन दलाच्या जागेवर त्यांनी बंगला बांधला. लोकमंगलचे पैसे मध्यंतरी सापडल्यानंतर त्यांनी त्याचे उत्तर दिले नाही. तूर घोटाळ्यावर उत्तर दिले नाही. साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. ऊसदराचा प्रश्‍न आहे. स्वस्त धान्य दुकानासाठी साखर घेण्याची घोषणा केली. तरीही साखर का घेत नाही. इथेनॉलबाबत धरसोड धोरण आहे. 3400 रूपयाची साखर 2800 रूपयानी चालली आहे. शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे त्यांचे धोरण आहे.'' 

ते म्हणाले, "महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासात कधीही घडला नाही असा प्रकार म्हणजे उपाध्यक्षांचे पद साडेतीन वर्षे रिकामे ठेवले आहे. आज त्यांचे बहुमत आहे. ती जागा कोणाला द्यायची याचा निर्णय होत नाही. पंधरा वर्षानी त्यांची सत्ता आली आहे, त्यांना सत्ता सोडायची नाही. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. एकेक दिवस ढकलायचा उद्योग सध्या सुरू आहे.'' 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com