एटीएमची शटर डाऊनच, चलन तुटवडा कायम 

atm-closed
atm-closed

कोल्हापूर - नोटाबंदीमुळे बहुतांशी एटीएमची शटर आजही डाऊनच राहिली. करन्सी चेस्टमध्ये जेमतेम पंधरा कोटी रुपये जमा झाल्याने लोकांना थोडाफार दिलासा मिळाला. मात्र दोन हजाराच्या नोटेमुळे मनस्ताप काही कमी झालेला नाही. त्रस्त झालेल्या लोकांना आज थोडासा दिलासा मिळाला. एसबीआय वगळता बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि आरबीएलकडे पंधरा कोटींची रक्कम उपलब्ध झाली. स्टेट बॅंकेची एटीएम दिवसभर सुरू होती. 

पगारदार नोकर आणि पेन्शनर लोकांची चलन तुटवड्यामुळे पंचाईत झाली आहे. आजही लोक बॅंका तसेच एटीएमच्या रांगेत होते. करन्सी चेस्ट म्हणून स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आरबीएल या बॅंका काम पाहतात. स्टेट बॅंकेची एटीएम सुरू आहेत. मात्र पैसे नसल्याने अन्य बॅंका तसेच खासगी बॅंकांच्या एटीएमवरही विपरीत परिणाम झाला. बॅंकांतून चलनाद्वारे रक्कम काढण्यास मर्यादा आहेत. सुमारे 33 हजार निवृत्ती वेतनधारकांचे वेतन जमा झाले आहे. सरकारी कर्मचारी तसेच कार्पोरेट कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे पगार एक तारखेला जमा झाले आहेत. सेवानिवृत्तांना दोन हजार रुपये हाती पडले आहेत. सात हजार रुपये निवृत्ती वेतन असताना दोन हजारच मिळाल्याने औषधांचा खर्च करायचा कसा, असा प्रश्‍न अनेक ज्येष्ठांसमोर आहे. 
शहरातील बहुतांशी एटीएम आजही बंद राहिले. अनेक ठिकाणी एटीएम बंद आहे, असे फलक लावले गेले आहेत. एसबीआयच्या एटीएमसमोर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com