आटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात

आटपाडी - कारवाईदरम्यान पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात

आटपाडी -  येथे बेकायदेशीर वाळू साठयावर तलाठ्यानी कारवाई केलयानंतर तहसीलदार सचिन लंगोटे यांनी घटनास्थळी जाऊन दुसर्‍यांदा पंचनामा केला. या कारवाईत जवळपास पाच ते सात ब्रास वाळू ताब्यात घेतली. 

दरम्यान, महसुलच्या कारवाईनंतर गावात दोन गटात वाद पेटला आसून, प्रकरण पोलिस ठाण्यात गेले आहे.            

याबाबत अधिक माहिती अशी की, माळेवाडी ग्रामपंचायतीने दिड वषापुवी रोहयोतून विहिरीचे काम केले आहे. या विहिरीच्या कठड्याच्या कामासाठी ओढा पात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केला होता. तसेच विहीरीच्या कामाच्या नावाखाली वाळूची विक्री केल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारी नंतर पहिल्यांदा तलाठ्याने छापा टाकून जुजबी कारवाई केली. सदर कारवाईने ग्रामस्थांचे समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार कळम पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना स्वतः घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. तहसीलदार सचिन लंगोटे आणी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी घटनास्थळाला भेट दिली.यावेळी पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी सोबत होते. यावेळी साठा केलेले पाच टॅकटर वाळू जप्त करून पंचनामा केला. याठिकाणी आतापर्यंत दोन वेळा कारवाई झाली असून एकूण सात ब्रास वाळू साठा महसूल विभागाने ताब्यात घेतला आहे तसेच या वाळू साठ्या प्रकरणी ग्रामपंचायतीला महसूल विभागाने नोटीस काढली आहे. 

दरम्यान वाळू वरील कारवाईने गावात दोन गटात संघर्ष उडाला आहे. दोन्ही गटानी आटपाडी पोलिस ठाण्यात परस्पर तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील प्रत्येकी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com