संशयिताच्या घरावर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

तीन वाहनांची मोडतोड, जोरदार दगडफेक

तीन वाहनांची मोडतोड, जोरदार दगडफेक
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. कृष्णा किरवले यांचा खून झाल्यानंतर प्रक्षुब्ध जमावाने संशयित आरोपी प्रीतम पाटील याच्या घरावर दगडफेक केली. घराची मोडतोड केली. याशिवाय घराबाहेर उभी करण्यात आलेली मोटार, दुचाकी व सायकलचीही मोठे दगड घालून मोडतोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे या घराशेजारी महिला व लहान मुले सैरावैरा पळत सुटले. नेमके काय घडले याची माहिती न मिळाल्याने महिला मिळेल त्या रस्त्याने पळत सुटल्या.

डॉ. किरवले यांच्या खुनानंतर पोलिस उपअधीक्षकांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कार्यकर्ते अगोदरच संतप्त बनले होते. हा गदारोळ शांत होतो न होतो तोच यातील कार्यकर्त्यांनी संशयित आरोपी पाटील याच्या घरावर हल्ला चढवला. दगड, विटांसह हाताला लागतील त्या वस्तू घरावर भिरकावल्या. एवढेच नव्हे तर दारात उभ्या केलेल्या तीन वाहनांचेही नुकसान केले. घराचा दरवाजा उघडा असल्याने त्यातून कार्यकर्त्यांनी घरातही दगड भिरकावले. खिडकीच्या काचांसह छतावरही प्रचंड दगडफेक करून काचेच्या साहित्यांचा चक्काचूर केला.

अचानक घडलेल्या या प्रकाराने घराशेजारील लोकांमध्ये घबराट पसरली. घरात आणि घराबाहेर थांबलेल्या महिलांचा भीतीने थरकाप उडाला. त्यामुळे मिळेल त्या रस्त्याने त्या पळत सुटल्या. सुमारे 20 मिनिटे दगडफेक सुरू होती. पोलिसांना बोलवा, असे महिला ओरडून इतरांना सांगत होत्या. तोपर्यंत या कार्यकर्त्यांनी प्रचंड हल्ला करत मोडतोड केली. यातील पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले व त्यांची समजूत काढत त्यांना घरापासून दूर नेले. तोपर्यंत या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, हे प्रकरण वाढणार असे समजून त्या गल्लीतील सर्व वाहने इतरत्र हलविण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर: सरकारी कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. लाच मागणाऱ्या अधिकारी,...

06.06 PM

उंब्रज (कऱ्हाड, जि. सातारा) : गावठी कट्टा विकण्याच्या उद्देशाने आलेल्या एकास पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली. येथील इंदोली...

03.42 PM

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सोडवणुकीसाठी आपण मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असून मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे...

02.48 PM