मूलभूत सोयी-सुविधांवर भर देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

वेखंडवाडी, सोनवडे, आरेवाडीच्या विकासासाठी शंभूराज देसाई यांनी दिला ३.६९ कोटींचा निधी

कऱ्हाड - आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्‍यातील दोन व कऱ्हाड तालुक्‍यातील एक गाव दत्तक घेतले आहे. मूलभूत सुविधा जितक्‍या ‘स्ट्राँग’ देता येतील, तितक्‍या देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तारळे भागातील वेखंडवाडी, सोनवडे व कऱ्हाड तालुक्‍यातील आरेवाडी गावात त्यांनी विकासासाठी प्रयत्न केले आहेत. तिन्ही गावांसाठी आजअखेर तीन कोटी ६८ लाख ५६ हजारांचा निधी वेगवेगळ्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. 

दत्तक घेतलेल्या प्रत्येक गावात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार त्यांनी आखला आहे. पाच वर्षांत गावात मूलभूत सुविधांसह अद्ययावत सुविधा पोचवण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. ग्रामस्थही त्यासाठी कष्ट घेत आहेत. दत्तक घेतलेल्या तिन्ही गावांत आमदार देसाई यांनी अत्यंत नियोजनबद्ध काम सुरू ठेवले आहे. तिन्ही गावांच्या विविध प्रश्‍नांवर १२ मे रोजी त्यांनी स्वतंत्र बैठक बोलावून त्या गावातील लोकांची मते जाणून घेण्याचा त्यांचा मानस आहे. गावातील लोकांच्या गरजा विचारात व त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा यात फरक राहता कामा नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी गाव, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या स्तरावर आराखडा तयार केला आहे. तिन्ही गावांत अंतर्गत रस्ते, गरजेनुरूप आराखडा, चौक सुभोभीकरण, स्मशानभूमी, बहुद्देशीय हॉल, शैक्षणिक सुविधा, अंगणवाडीसह शेतीविषयक सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. 

वेखंडवाडीला दोन कोटी २० लाख ९५ हजार, सोनवडेला एक कोटी २९ लाख ९५ हजार तर आरेवाडीला सात लाख ६६ हजारांचा निधी दिला आहे. वेखंडवाडीला अंतर्गत रस्ता, साकव पूल, गटारे आदी कामांसह तेथे एसटी सुरू करण्याचे त्यांनी प्रयत्न केले आहेत. तारळे ते खबालवाडीपर्यंतचा चार किलोमीटरचा रस्ताही आमदार देसाई यांच्या माध्यमातून झाला आहे. आरेवाडीला मुख्यमंत्री पेयजेल पाणी योजना मंजूर करून घेतली आहे. त्याशिवाय तेथे अंतर्गत रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय अशी कामे प्रस्तावित आहेत. सोनवडे येथे एक कोटी २९ लाखांची विकासकामे त्यांनी केली आहेत. त्यात विविध कामांचा समावेश आहे. पाच वर्षांत तिन्ही गावांची मतदारसंघात वेगळी ओळख निर्माण व्हावी, यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. 

पाटण मतदारसंघ तसा विस्तृत, डोंगराळ व दुर्गम भागातील आहे. सुविधा पुरवण्यासाठी अभ्यास करावा लागला. त्यातून मतदारसंघात समन्वय राहावा, यासाठी पाटण तालुक्‍यातील दोन व कऱ्हाड तालुक्‍यातील एक गाव दत्तक घेतले आहे. मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गाव आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, निधी अपुरा आहे. अधिक निधी दिल्यास गावांमध्ये किमान मूलभूत सुविधा ताकदीने देता येतील.

- शंभूराज देसाई, आमदार, पाटण विधानसभा मतदारसंघ

Web Title: Attempts to emphasize basic amenities