महादेव जानकरांना फिरवणार नंदीबैलावरून  - बच्चू कडू

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 18 जून 2018

सोलापूर : महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले, असा प्रश्न उपस्थित करतानाच महादेवाचे वाहन असलेल्या नंदीबैलावर महादेव जानकर यांना फिरवू, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्य़क्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 

दिव्यांगांच्या निधी वितरणाबाबत आढावा घेण्यासाठी  कडू आज सोलापूर महापालिकेत आले होते. ते म्हणाले, उसाचे पाच हजार कोटी भेटले नाहीत. दुधाचे भाव कमी झाले. महादेव असताना दुधाचे भाव कसे कमी झाले. महादेवाचे वाहन नंदीबैल आहे. दुधाला योग्य भाव न मिळाल्यास नंदीबैलावरूनच जानकर यांना फिरवण्यात येईल. 

कर्जमाफीचा सर्वात मोठा लाभार्थी बॅंकवाले आहेत, असे सांगून  कडू म्हणाले, मुद्रा लोनच्या माध्यमातून फक्त भाजपच्या लोकांना कर्ज दिले गेले. एकाही सामान्य रोजगाराला कर्ज मिळाले नाही. सोलापुरातील एखादे उदाहरण सांगा, की गरीबाला मुद्रा लोनच्या माध्यमातून कर्ज मिळाले आहे. तसे असल्यास ते उदाहरण मी सर्व राज्यभर देईन. कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्याला कमी बॅंकेला जास्त झाला आहे. बॅंकांवर सरकारचे नियंत्रणच नाही. यांची सारी मिली जुली आहे. शेतकरी मेला काय, जगला काय, त्याचे काही सोयरसूतक या शासनाला नाही.  

भाजपचा डीएनए तपासला तर त्यांच्यात अर्ध्यांच्यावर कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेसचेच नेते दिसतील. पूर्ण भाजप आता राहिलीच नाही. हे सगळे भाऊ भाऊ आहेत. चोर-चोर मौसेरे भाई, यातला प्रकार आहे, असेही  कडू म्हणाले.

Web Title: bacchu kadu criticizes mahadev jankar over the milk price issue