शेती व शिक्षणाच्या विकासासाठी बलवंत फाऊंडेशन कटिबध्द- टी.आर. गारळे

malwadi.
malwadi.

मलवडी - ग्रामीण भागातील शेती आणि शिक्षण यांच्या विकासासाठी बलवंत फाऊंडेशन दहिवडी कटिबध्द असून, त्यांचे उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत. असे प्रतिपादन शेळी मेंढी महामंडळाचे माजी अध्यक्ष टी. आर. गारळे यांनी केले.

बलवंत फाऊंडेशन दहिवडीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त टाकेवाडी (माण) येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन, सुधारीत जातीच्या भाजीपाला बियाणांचे वाटप व वह्यांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी गोरख शेलार, तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार, बलवंत फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा चारुशिला पाटील, विश्वस्त सुशिल शिंगाडे, मंडल कृषी अधिकारी नाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. गारळे पुढे म्हणाले की, टाकेवाडीने जलसंधारणाचे उत्कृष्ट काम केले आहे. आता गरज आहे ती निरोगी शेती व चांगल्या शिक्षणाची. बलवंत फाऊंडेशन भाजीपाल्याचे बियाणे पुरवत असून शेतकर्यांना उत्तम बाजारपेठ मिळावी यासाठी मदत सुध्दा करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करुन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मदतीचा हात पुढे केला आहे.

श्री. शेलार यांनी बलवंत फाऊंडेशनच्या सहकार्याने टाकेवाडीचे ग्रामस्थ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील असा विश्वास व्यक्त केला. तर श्री. पवार यांनी सेंद्रिय शेती बद्दल सविस्तर मार्गदर्शन करुन शेतकर्यांच्या शंकांचे निरसन केले. चारुशिला पाटील यांनी जलसंधारण व मनसंधारण केलेल्या टाकेवाडीला सर्वतोपरी मदत करण्यास बलवंत फाऊंडेशन तयार असल्याचे सांगितले.

यावेळी शेतकऱ्यांना गवार, भेंडी, दोडका, मिरची, टोमॅटो, कारले, पालक इ. बारा प्रकारच्या भाजीपाल्याच्या सुधारीत बियाणांचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सरपंच सिंधू माने, जालिंदर दडस यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादा दडस, अविनाश बरकडे, हर्षद शिंदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. महादेव दडस यांनी सुत्रसंचालन केले तर गंगाराम दडस यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com