विठ्ठल मंदिरातील झटपट दर्शनावर बंदी 

Ban On Immediate Darshan In Vitthal Temple Pandharpur
Ban On Immediate Darshan In Vitthal Temple Pandharpur

पंढरपूर : येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी विठ्ठल मंदिर समिती आणि सुरक्षा समितीने पुढाकार घेतला आहे. झटपट दर्शनासाठी सोडल्या जाणार्या मंदिरातील तिन्ही मार्गावरील दरवाजे बंद केले आहेत. मंदिर समितीने घेतलेल्या या महत्वाकांक्षी निर्णयाचे विठ्ठल भक्तांनी स्वागत केले आहे.

काही दिवसांपूर्वी विठ्ठल मंदिरातील दर्शनाचा काळाबाजार पोलिसांनीच समोर आणला होता. त्यापूर्वीही झटपट दर्शऩ देणारी दलालांची टोळी सक्रीय होती. दर्शन देण्याच्या या गोरख धंद्यातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. यामध्ये मंदिर समितीचे सदस्य व काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा होती.

अलीकडेच पैसे घेवून भाविकांना व्हीआयपी दर्शन देण्याचा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मंदिर समितीचे सदस्य सचिन अधटराव यांच्यासह दोन दलालांवरती गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरामुळे मंदिराची बदनामी झाली होती. 

मंदिरातील झटपट दर्शनामुळे भाविकांमध्येही मंदिर समितीच्या व्यवस्थानापना विषयी ही कमालीची नाराजी व्यक्त केली जात होती. मंदिरात पैसे घेवून दर्शनासाठी भाविकांना सोडणाऱ्या दलालांची साखळी मोडीत काढण्यासाठी व झटपट दर्शनाला पायबंद घालण्यासाठी मंदिर समिती व मंदिर सुरक्षा समितीने मंदिरातील अंतर्गत उत्तर दरवाजा, हनुमान दरवाजा आणि सोळखांबी जवळील गेट असे तिन्ही दरवाजे बंद केले आहेत. यामुळे आता झटपट दर्शन घेणे बंद झाले आहे.

मंदिर सुरक्षा समितीच्या अधिकार्यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे भाविकांमधून स्वागत केले जात आहे.

मंदिरात पैसे घेवून भाविकांना झटपट दर्शन घडवून आणणारी दलालांची टोळी सक्रीय झाली होती. मध्यंतरी असा प्रकार समोर आला होता. त्यानंतर असे प्रकार घडूनये यासाठी मंदिर समिती आणि मंदिर सुरक्षा समितीने मंदिरातील झटपट दर्शनासाठी सोडले जाणारे तिन्ही दरवाजे बंद केले आहेत. - भगवान खरतोडे, पोलिस निरीक्षक विठ्ठल मंदिर, पंढरपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com