संकेश्‍वरजवळ अपघातात मोटार सायकलस्वार ठार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

संकेश्‍वर - येथील महामार्गावर हेब्बाळ (ता. हुक्केरी) नजीक शुक्रवारी (ता. 6) रात्री उशिरा झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

संकेश्‍वर - येथील महामार्गावर हेब्बाळ (ता. हुक्केरी) नजीक शुक्रवारी (ता. 6) रात्री उशिरा झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जागीच ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

शिवपुत्र गणपती लब्बी (वय 25 रा. गंगानगर, संकेश्‍वर) असे मृताचे नाव आहे. किरण ऊर्फ राजू बाबूराव सपाटे (वय 45 रा. अंकली रोड, संकेश्‍वर) असे जखमीच नाव आहे. शुक्रवारी (ता. 6) रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बेळगावहून संकेश्‍वरकडे मोटार सायकल (केए 23 एस 5523) ने अज्ञात वाहनाला धडक दिली. त्यात मोटारसायकलस्वार शिवपुत्र लब्बी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाठीमागे बसलेल्या सपाटे यानाही गंभीर जखम झाली. त्यांना बेळगावमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद संकेश्‍वर पोलिस ठाण्यात झाली आहे.