बस बंदमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी

बस बंदमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी

बेळगाव - महाराष्ट्रात सुरू असलेल्या बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत काम बंद आंदोलनाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला आहे. ऐन दिवाळीत आंदोलनामुळे खरेदीसाठी आणि कामावरून गावाला जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी खासगी वाहनांमध्ये गर्दी वाढली आहे. तर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. बस बंदमुळे रेल्वेगाड्यांना गर्दी होत आहे.

सीमाभागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या लोकांना आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे. वेंगुर्लामार्गे आणि कोवाडमार्गे बेळगावहून अनेक बसफेऱ्या होतात. महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले असले तरी कर्मचाऱ्यांनी कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसगाड्यांनाही प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे सीमाभागातून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत झाली आहे. त्याचबरोबर चंदगड, गडहिंग्लज, आजरा, नेसरी, नागनवाडी आदी सीमाभागात दिवाळीनिमित्ताने बेळगावला येणाऱ्या प्रवाशांनाही मोठी अडचण निर्माण झाली आहे. चंदगड तालुक्‍यातील लोक खरेदी, औषधोपचारासाठी बेळगावात येतात. पण, आंदोलनामुळे लोकांना हाल सहन करावे लागत आहेत. 

खासगी वाहनांचा पर्याय
चंदगड तालुक्‍यात जाणाऱ्या बसस्थाकावर प्रवाशांची गर्दी होत आहे. युनियन जिमखान्याजवळ चंदगड बस स्टॉपवर प्रवाशांची दोन दिवसांपासून गर्दी वाढली आहे. आजही मोठ्या प्रमाणात प्रवासी होते. बस गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली. खासगी वाहनधारकांची यामुळे चंगळ झाली असून वाहनात जास्तीतजास्त प्रवाशी नेण्याचा प्रयत्न होत आहे.

मी नेहमी शासनाच्या बसने प्रवास करतो. पण, गेल्या दोन दिवसांपासून बस गाड्या बंद आहेत. कर्नाटक परिवहन खात्याच्याही बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी अडचणीला तोंड द्यावे लागते. सध्या खासगी टॅम्पो सुरू आहेत. पण, त्यामध्ये मोठी गर्दी असल्यामुळे प्रवास नकोसा वाटत आहे. शासनाने पर्याची सूचना द्यावी.
- संदीप बिर्जे  
प्रवासी, कोवाड

रेल्वेंना गर्दी 
महाराष्ट्रात सुरू असलेल्या बस आंदोलनाचा परिणाम रेल्वे विभागावर दिसून येत आहे. बस नसल्यामुळे लोकांना रेल्वेने प्रवास करण्याची वेळ आली आहे. रेल्वेचा प्रवास स्वस्त असला तरी रेल्वे उशिला पोहोचते. पण, बस बंदमुळे सांगली, मिरज, कोल्हापूर आदी भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करत आहेत. त्यामुळे बेळगाव रेल्वे स्टेशनवर लोकांची गर्दी दिसून येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com