बेळगाव : बंदोबस्तासाठी २,२३१ पोलिस तैनात

परजिल्ह्यातून ७३६ पोलिस, तीन ड्रोन कॅमेरे व ६५ सीसीटीव्हींची नजर
पोलिस
पोलिसsakal

बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस खात्याकडून चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. बंदोबस्तासाठी तब्बल २,२३१ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून परजिल्ह्यातून ७३६ पोलिसांना पाचारण करण्यात येणार आहे. शिवाय मिरवणूक मार्गावर तीन ड्रोन कॅमेऱ्यांची नजर असणार असून ६५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

शिवजयंती आणि चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसांपासून पोलिस खात्याकडून तयारी केली जात आहे. मध्यवर्ती शिवजयंती महामंडळ, शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली जात आहे. त्याचबरोबर मिरवणुकीच्या मार्गाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अनेकवेळा पाहणी करून बंदोबस्ताबाबत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या काळात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी या काळात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त असला तरीही सर्व मंडळांनी स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

चित्ररथ मिरवणुकीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सर्व घडामोडींवर पोलिसांची बारीक नजर असणार आहे. मिरवणुकीवर साध्या वर्दीतील पोलिसही लक्ष ठेवून असणार आहेत.

सर्वांनी चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. हुल्लडबाजी करु नये. कायदा व सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस खात्याकडून बंदोबस्ताची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी एकूण २,२३१ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय तीन

ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर मिरवणुकीवर असणार आहे.

- डॉ. एम. बी. बोरलिंगय्या,पोलिस आयुक्त

पोलिस बंदोबस्त असा

  • पोलिस आयुक्त १

  • पोलिस उपायुक्त २

  • पोलिस उपअधीक्षक/एसीपी १५

  • पोलिस निरीक्षक ४०

  • उपनिरीक्षक १४०

  • केएसआरपीच्या तुकड्या १२ (३०० पोलिस)

  • सीएआर ४२

  • तोडफोड विरोधी तपास पथके ३ (३० कर्मचारी)

  • पोलिस कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल १२००

  • होमगार्ड ४००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com