नामदार गणप्या गावडे जेंव्हा 'तुटकी' खुर्ची उचलतात...

Bharat Jadhav
Bharat Jadhav

सोलापूर : मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या नामदार गणप्या गावडे चित्रपटातील प्रमुख पात्र असलेले गणप्या गावडे (अभिनेते भरत जाधव) यांनी  हुतात्मा स्मृती मंदीरची पाहणी केली. आसन व्यवस्था पाहताना खुर्ची किती मजबूत बसवली आहे, याची चाचपणी करताना त्यांना धक्काच बसला, कारण खुर्ची थेट त्यांच्या हाती आली. त्यांनी ती पूर्णपणे उचलली आणि स्मृती मंदीरमधील कामाचा दर्जा स्पष्ट झाला. 

पाहणीनंतर श्री. जाधव यांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ अभिनेते जयराज नायर, स्थापत्य समिती सभापती गुरुशांत धुत्तरगांवकर, नाट्य व्यवस्थापक प्रशांत बडवे, गुरु वठारे, विजय साळुंखे आदी उपस्थित होते. आयुक्तानंतर त्यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेतली. सोलापूरातील हुतात्मा स्मृती मंदिरातील (नाट्यगृह) ना खुर्च्या व्यवस्थित आहेत ना रंगमंच व्यवस्थित आहे ग्रीन रुम्स बद्दल तर न बोलले बरे त्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिराची एकूणच स्मृती मंदिराची व्यवस्था अतिशय वाईट असून ती तातडीने सुधारावी अशी मागणी आयुक्तांकडे केली. 

एका नाटकाच्या प्रयोगासाठी श्री. जाधव आज सोलापूरात आले होते. त्यावेळी त्यांनी स्मृती मंदिराचा कोपरानकोपरा फिरुन पाहिला व तेथील अस्वच्छता, मोडलेल्या खुर्च्या, बंद पडलेले एसी, आदी बाबींची माहिती घेतली. श्री. जाधव म्हणाले,"" हुतात्मा स्मृती मंदिराची रचना खूप चांगली आहे. प्रेक्षाकांचा आसनाची व्यवस्था इतकी उत्तम आहे की विनोदी प्रयोगाच्या वेळी शेवटच्या रांगेतील खुर्च्यांवर बसलेल्या प्रेक्षकांपासून ते अवघ्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांचा हास्याचा खळखळाट थेट आम्हा रंगमंचावरील कलावंताच्या अंगावर येतो. त्यामुळे आम्हाला आमच्या उत्तम कामाची पावती मिळते. स्मृती मंदिरात अनेक वर्ष आम्ही प्रयोग केले. इथल्या कलाकारांच्या खोल्यांमध्ये राहिला. मोकळ्या पोर्च मध्ये क्रिकेट खेळलो आहे. अनेक दिग्गज कलावंतानी इथ प्रयोग केला आहे इतकी मोठी परंपारा या नाट्यगृहाला आहे. त्यामुळे त्याची उत्तम व्यवस्था झाली पाहिजे.'' 

..तर रसिकप्रेक्षकांची संख्या कमी होईल 
श्री. जाधव यांनी प्रेक्षागृहात फिरताना तुटलेल्या खुर्च्या थेट हातात उचलून घेत आसनव्यवस्थेविषयी खंत व्यक्त केली. प्रेक्षक चार-पाचशे रुपये मोजून अशा विनाआरामदायी खुर्चांवर अडीच तीन न तास कसा बसू शकेल. अशी आसन व्यवस्था असेल तर नाटकांचा प्रेक्षकवर्ग अपोआप कमी होइल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com