सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा 

सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा 

सांगली - सांगली जिल्हा परिषदेत भाजपने "झिरो टू हिरो' असा इतिहास घडवताना रयत आघाडीसह 29 जागा पटकावल्या. त्यामध्ये 25 जागा चिन्हावर जिंकल्या आहेत. भाजपने पलूस, कडेगाव, आटपाडी, जत, मिरज या पाच पंचायत समितीत पूर्ण सत्ता मिळविली. राष्ट्रवादीने 14 जागांसह जिल्हा परिषदेत दुसरे स्थान राखले. 

कॉंग्रेसला दहा जागा कशाबशा मिळवता आल्या. यापूर्वी कॉंग्रेसच्या 23 जागा होत्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने खिंडार पाडूनही राष्ट्रवादीने जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी केली.

वाळव्यात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने 11 पैकी 5 जागांवर यश मिळवले. बागणीत राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलगा सागरचा पराभव झाला. शिवसेनेने आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली खानापूर पंचायत समितीवर भगवा फडकवला. त्यांनी जिल्हा परिषदेला तीन तर पंचायत समितीत 5 जागा मिळवल्या. 

तासगावमध्ये सुमनताई पाटील याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सहापैकी चार जागा जिंकल्या. पंचायत समितीच्या सात जागांसह सत्ता राखली. खासदार संजय पाटील यांना हा मोठा धक्का आहे. शिराळ्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी कॉंग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या मदतीने आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्का दिला. आमदार नाईक यांना एकमेव पणुब्रे गणातील जागा जिंकता आली. पृथ्वीराज देशमुख आणि अरुण लाड यांच्या राष्ट्रवादी-भाजप आघाडीने पलूस आणि कडेगाव तालुक्‍यांत कॉंग्रेसची धुळधाण उडवली. पतंगरावांचे जावई महेंद्र लाड यांना शरद लाड यांनी कुंडल गटात पराभूत केले. 

आटपाडीत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी तालुक्‍यातील चारही जागा जिंकून भाजपला यश मिळवून दिले. भाजप आमदार विलासराव जगताप यांनी जत तालुक्‍यात नऊ पैकी सहा जागा जिंकल्या. मिरज तालुक्‍यात 10 जागांसह भाजप पंचायत समितीतीत मोठे यश मिळविले तर कॉंग्रेस 7 तर राष्ट्रवादीला 2 तर अपक्ष 2 आणि शेतकरी संघटना एक असे बलाबल आहे. भाजपला जिल्हा परिषदेत मिरज तालुक्‍यातून 6 जागांसह मोठा हात दिला आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यात अजित घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी-स्वाभिमानी आघाडीने सर्व 4 जागा जिंकल्या. 

कडेगाव पंचायतीत पतंगरावांना एकच जागा 
मिरज पंचायत समितीत कॉंग्रेस सत्तेबाहेर 
पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे पुत्र पराभूत 
खासदार संजय पाटील यांना सुमन पाटील यांचा धक्का 
शिराळ्यात शिवाजीराव नाईक यांना पंचायतीची एकच जागा 

एकूण जागा - 60 
भाजप - 29 
कॉंग्रेस 10 
राष्ट्रवादी 14 
शिवसेना 3 
अपक्ष 4 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com