महिलांसाठी नववधू मेकअप कार्यशाळा 20 पासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - येथील ऍड स्पॉट स्टुडिओ आणि मधुरांगण परिवारातर्फे 20 फेब्रुवारीपासून दोन दिवसीय "ब्राईड मी गॉर्जियस' नववधू मेकअप कार्यशाळेचे आयोजन केले आहे. हॉटेल वृषाली येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ही कार्यशाळा होणार असून प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टिस्ट अल्पा राजगोर कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

मेकअप आणि हेअर स्टाईल या क्षेत्रात आता महिलांना मोठ्या संधी उपलब्ध असून करिअर म्हणूनही या क्षेत्राकडे ओढा वाढतो आहे. या पार्श्‍वभूमीवर मेकअपमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासासाठी कार्यशाळा होणार असून अशा पद्धतीची पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिलीच कार्यशाळा आहे. कार्यशाळेत सहभागासाठी दोन हजार रुपये प्रवेश शुल्क असून मधुरांगण सभासदांसाठी तीनशे रुपयांची सवलत मिळणार आहे. प्रवेश शुल्कात प्रशिक्षणाबरोबरच दोन दिवसांच्या चहा-नाष्टा आणि जेवणासोबत एक ब्रॅंडेड मेकअप गिफ्ट हॅम्पर आदी सुविधा मिळणार आहेत. कार्यशाळेनेतर हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसूदन हॉलमध्ये 22 फेब्रुवारीला ब्रायडल मेकअप स्पर्धा होणार आहे. कार्यशाळेत सहभागी महिलांना या स्पर्धेसाठी मोफत प्रवेश असेल. कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून 15 फेब्रुवारीपर्यंतच नावनोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - अनुराधा पित्रे- 9860038327, जयश्री देसाई - 9146041816. 

बॉलिवूडच्या मेकअप आर्टिस्ट 
अल्पा राजगोर या बॉलीवूडच्या प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट असून दहा वर्षांहून अधिक काळ त्या प्रोफेशनल मेकअपचे प्रशिक्षण देतात. दीड हजाराहून अधिक चर्चासत्रे व कार्यशाळा त्यांनी घेतल्या असून मेकअपच्या सोप्या पद्धती विकसित केल्या आहेत. अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले असून सध्या मुंबईत प्रोफेशनल स्टुडिओ व ऍकॅडमी त्यांनी सुरू केली आहे. 

Web Title: Brides makeup workshops for women from 20