खरेदीदार - अडत्यांची सोलापुरात छुपी युती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

सोलापूर - फळे व भाजीपाला नियमनमुक्तीच्या आदेशामुळे बाजार समितीमधील व्यवहार अद्यापही सुरळीत झालेले नाहीत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना खरेदीदार व अडत्यांमध्ये छुपी युती असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. 

 

सोलापूर - फळे व भाजीपाला नियमनमुक्तीच्या आदेशामुळे बाजार समितीमधील व्यवहार अद्यापही सुरळीत झालेले नाहीत. शेतकऱ्यांचा माल खरेदी करताना खरेदीदार व अडत्यांमध्ये छुपी युती असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. हे टाळण्यासाठी बाजार समितीच्या प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. 

 

किरकोळ भाजीविक्रेते आणि ठराविक कांदा खरेदीदार वगळता मोठ्या प्रमाणात लिलावाची प्रक्रिया अजूनही व्यवस्थित झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. गेल्या आठवड्यापासून खरेदीदार अडतीच्या प्रश्‍नावरून अडले आहेत. शेतकऱ्यांना स्वतःचा माल स्वतः विक्रीशिवाय पर्याय राहिलेला नाही. पण त्यासाठी आवश्‍यक असलेले संरक्षण पोलिस आणि बाजार समिती प्रशासन द्यायला तयार नाही. दोनच दिवसांपूर्वी शहरातील काही मंडईंमध्ये शेतकरी शेतीमाल विक्रीस बसले, तर त्यांना हुसकावून लावण्यात आले. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरही काही ठिकाणी शेतकरी शेतीमाल विक्रीस बसले. पण त्यात किरकोळ विक्रेत्यांनी घुसखोरी केली. त्याचा परिणाम खरे शेतकरी बाजूला पडले आणि पुन्हा या भागात दलाली सुरू झाली. 

 

बाजार समितीत, बाजार समितीच्या बाहेर आणि शहरात अशा चोहोबाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी सुरू आहे. आजही काही मोजक्‍याच प्रमाणात लिलाव झाले. सरसकट लिलाव झाले नाहीत, भाजीपाला हा नाशवंत प्रकारामध्ये मोडतो, त्यामुळे त्याचे वेळीच लिलाव होणे आवश्‍यक आहेत. सर्वांनाच याची कल्पना आहे, पण त्याचा कोणीच विचार करत नाही. बाजार समितीच्या प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्याची आवश्‍यकता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - महावितरणचे वीज बिल ग्राहकांना अचूक मिळावे, बिलासंदर्भातील तक्रारींचा ओघ कमी व्हावा, यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर...

04.45 AM

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीची सभा झाल्यापासून शांत असलेले जिल्हा परिषदेतील राजकारण आता तापू...

04.33 AM

सांगली - उदंड जाहला घोडेबाजार अशी स्थिती आज मागासवर्गीय समितीच्या सभापती निवडीच्या निमित्ताने दिसून आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीत...

04.03 AM