जात प्रमाणपत्र तपासणीस प्रशासनाकडून मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जुलै 2016

सातारा - इयत्ता अकरावी व बारावीत असलेल्या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. 

सातारा - इयत्ता अकरावी व बारावीत असलेल्या मागासवर्गीय (अनुसूचित जमाती वगळून) विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्र तपासणीसाठी शासनाने मुदत वाढ दिली आहे. 

 
राज्यातील काही मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शासनाने निर्धारित केलेल्या मुदतीत अपरिहार्य कारणामुळे अर्ज सादर केले नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्रांची तपासणी होऊ शकली नाही. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ही मुदत वाढ दिली आहे. त्यानुसार 2015- 16 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी 25 जानेवारी 2000 मध्ये विहित मुदतीत जाती प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी अर्ज सादर केले नाहीत व 2015- 16 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषध निर्माणशास्त्र या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छितात अशा विद्यार्थ्यांना आपल्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करून घेण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार जे विद्यार्थी 2015- 16 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेच्या इयत्ता 12 वीमध्ये शिकत आहेत, त्यांनी संबंधित महाविद्यालयामार्फत आपले अर्ज संस्थेच्या प्राचार्यांकडे 20 जुलैपर्यंत द्यावेत. शैक्षणिक संस्थांनी असे प्रस्ताव संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडे 27 जुलैपर्यंत पाठवावेत. सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी संबंधित विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे 31 जुलैपर्यंत पाठवावेत. हे अर्ज समितीने 30 सप्टेंबरपर्यंत तपासून द्यावेत, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.