महसूलमंत्र्यांचे कोळीगीत अन्‌ बालमित्रांचा जल्लोष!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

कोल्हापूर : टिमक्‍याची चोळी बाई, रंगान फुलायली...तुझी माझी जमली जोरी माझे वसयकरीण बाय गो... असा सूर आज (मंगळवार) राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छेडला अन्‌ त्या तालावर बालमित्रांनी अक्षरशः जल्लोष साजरा केला. 

निमित्त होते येथील कोल्हापूर थिएटर आणि फिनिक्‍स क्रिएशन्स आयोजित अभिनय प्रशिक्षण शिबिराला मंत्री श्री. पाटील यांच्या सदिच्छा भेटीचे. कलापूर कोल्हापुरात गेल्या काही वर्षात खेळाडू मोठ्या संख्येने तयार झाले. मात्र, त्या तुलनेत मोठ्या कलाकारांची कमतरता जाणवते. या पार्श्‍वभूमीवर शालेय वयातच मुलांना करियरच्या दृष्टीने अभिनय प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले आहे. 

आठ दिवसांपूर्वी त्याचे उद्‌घाटन मंत्री श्री. पाटील यांच्याच हस्ते झाले होते. आज त्यांनी या शिबिराला भेट देवून शिबिरार्थींची तयारी जाणून घेतली आणि बालमित्रांबरोबर संवादही साधला. स्वतःच्या शिबिराच्या आठवणी जागवताना त्यांनी कोळीगीतही सादर केले.