जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी सेंटर 

जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी सेंटर 

कऱ्हाड - कर्करोगाच्या आजाराचा खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे रुग्णांची मोठी परवड होते. सामान्य कुटुंबातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचार मिळून त्यांच्यावर औषधोपचार करता यावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयात कर्करोगावरील केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील दहा जिल्ह्यांत हे सेंटर सुरू करण्यात येईल. त्यासाठी आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरू झाली आहे. 

अलीकडे कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत आहे. या आजाराचा खर्च सर्वसामान्य रुग्णांना परवडत नाही. सध्या ही सेवा शासकीय रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात भरमसाट पैसे खर्च करून पदरमोड करावी लागते. परिणामी त्यांना या उपचारावरील खर्च करणे आवाक्‍याबाहेर जाते. पैशाअभावी उपचाराकडे दुर्लक्ष होऊन रुग्ण दगावण्याचीही शक्‍यता निर्माण होते. त्याचा विचार करून सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना शासकीय रुग्णालयात कर्करोगावरील उपचार मोफत मिळून त्यांच्यावर औषधोपचार करता यावा, यासाठी राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांत कर्करोगावरील केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. जिल्हा रुग्णालयात हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. सध्या रुग्णालयात औषधांचा पुरवठा करण्यासाठी टेंडरव्दारे औषधे खरेदी करण्याचीही कार्यवाही सुरू आहे. औषधे उपलब्ध झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयांतून केमोथेरपी उपचाराची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कर्करोगग्रस्त रुग्णांची चांगली सोय होईल. परिस्थितीअभावी उपचारापासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना त्याव्दारे संजीवनीच मिळणार आहे. 

...येथे होणार सेंटर 
सातारा, पुणे, नाशिक, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, जळगाव, अकोला, नागपूर 

टाटा हॉस्पिटलकडून उसनवार औषधे 
आरोग्य विभागाकडून जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी सेंटर सुरू करण्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी औषधांची गरज आहे. टेंडर काढून औषधे खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठीची कार्यवाही पूर्ण होऊन ती औषधे रुग्णांपर्यंत पोचण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे शासनाकडून औषधे उपलब्ध होईपर्यंत अत्यावश्‍यक असलेली कर्करोगविरोधी औषधे रुग्णांना मिळून त्यांची गरज भागावी यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडून संबंधित औषधे उसनवार घेण्यात येणार आहेत. शासनाकडे औषधे उपलब्ध झाल्यानंतर टाटा हॉस्पिटलला ती परत दिली जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com