'गाळ्या'वरून सोलापूरमध्ये पदाधिकारी-प्रशासनात ठिणगी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 25 एप्रिल 2018

सोलापूर :  महापालिकेच्या गाळे लिलावावरून पदाधिकारी आणि प्रशासनामध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्‍यता आहे. गाळ्याबाबत समिती नियुक्त करण्याचा अधिकार "स्टेडियम कमिटी'ला नाही अशी भूमिका घेत गाळे लिलावाच्या प्रक्रियेसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. 

पार्क मैदानातील गाळ्यांबाबत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समिती नियुक्त करून भाड्याबाबत "सुवर्णमध्य' साधण्याचे धोरण महापौरांनी घेतले आहे. मात्र, या भूमिकेस आयुक्तांचा विरोध आहे. गाळे ही महापालिकेची मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचे दर ठरविण्याचे अधिकार महापालिकेस आहेत, कोणत्याही समितीला नाही, अशी भूमिका घेत, शासनाने दिलेल्या आदेशानुसार गाळ्यांचा लिलाव करणारच, अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. 

दरम्यान, शहरातील गाळ्यांच्या लिलावाबाबतचे स्मरणपत्र शासनाकडे गेले आहे. त्याबाबत अद्याप शासनाचे उत्तर आलेले नाही. पारस इस्टेटमधील गाळेधारकांची सुनावणी घेण्यात आली असून, गाळे रिकामे करण्याबाबत त्यांना अंतिम नोटीसही बजावण्यात आली आहे. या गाळ्यांचा लिलाव थांबलेला असतानाच पार्क स्टेडिमच्या गाळ्यांचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याने पदाधिकारी व प्रशासनात पुन्हा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Clashes between Solapur Municipal Corporation and stadium committee