पालिका निवडणुकांसाठी एक नोव्हेंबरपासून आचारसंहिता?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

सांगली - राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचयातींच्या निवडणुकांसाठी १ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील आष्टा, विटा, तासगाव, इस्लामपूर, पलूस आणि कडेगाव नगरपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यासाठी नगराध्यक्षपदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक विभागाने अधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. 

नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गेली काही महिने राजकीय मंडळींनी तयारी केली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षण निश्‍चित झाल्यानंतर अनेक इच्छुक आणि राजकीय पक्षांनी आपापल्या प्रभागातील उमेदवारही निश्‍चित केले आहेत. 

त्यांनी आपापल्या प्रभागात प्रचारही सुरू केला आहे. एखाद्या प्रभागात जादा इच्छुक असणाऱ्या ठिकाणी राजकीय पक्षांना निवडून येणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचे आव्हान असणार आहे. 

यंदा नगराध्यक्ष निवड थेट नागरिकांतून करण्यात येणार असल्याने मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी निवडून आलेल्या नगरसेवकांतून नगराध्यांची निवड करण्यात येत होती. मात्र, थेट नगराध्यक्ष निवडीतील यापूर्वीचा अनुभव फारसा चांगला नाही. थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीबाबत सत्ताधारी भाजपमध्येही खल झाला. अखेर तो निर्णय कायम करण्यात आला. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांचे नगराध्यक्षांना किती सहकार्य करतील, यावरच नगरिचा विकास शक्‍य आहे. मतभेद राहिल्यास आणि नगरसेवकांनी अविश्‍वास आणल्यास पुन्हा दोन वर्षांनी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा मतदान करण्याची वेळ येणार आहे.

Web Title: code of conduct for municipal election

टॅग्स