उदयनराजेंसह दहा जणांवर खंडणी मागितल्याचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

जीवे मारण्याच्या प्रयत्नाचीही तक्रार; नऊ जणांना पोलिस कोठडी
सातारा - लोणंदस्थित (ता. खंडाळा) कंपनीच्या मालकाकडून खंडणी वसूल करणे, आणखी खंडणी देत नाही म्हणून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी उदयनराजे यांचे खासगी सचिव अशोक सावंत यांच्यासह नऊ जण अटकेत असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

अशोक कांतिलाल सावंत (वय ४६, रा. यशवंतनगर, अकलूज), रणजित अमृत माने (वय ३३, रा. साखरवाडी, फलटण), राजकुमार कृष्णात गायकवाड (वय २५, रा. होळ, ता. फलटण), सुकुमार सावता रासकर (वय ३२, बाजारतळ, लोणंद), धनाजी नामदेव धायगुडे (वय ३२, रा. पाडळी, खंडाळा), ज्ञानेश्‍वर दिलीप कांबळे (वय २९, रा. होळ), योगेश भुजंग बांदल (वय ३०, रा. होळ), महेश अप्पा वाघुले (वय २५, रा. माळ आळी, लोणंद) व अविनाश दत्तात्रय सोनवले (वय २८, रा. कोळकी, फलटण) अशी अटकेत असलेल्या संशयितांची नावे आहेत. उदयनराजेसह एकूण दहा जणांविरुद्ध गर्दी, मारामारी, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी स्वीकारणे, खंडणीसाठी मारहाण करणे, शिवीगाळ- दमदाटी करणे व जीवे मारण्याची भीती घालणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. 

खासदार उदयनराजेंना अटकपूर्व जामीन
या गुन्ह्यात खासदार उदयनराजे भोसले यांना न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. ता. ३१ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. धैर्यशील पाटील व ताहेर मणेर यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. कंपनीत १२०० ते १३०० कामगार काम करतात. असे असताना कंपनी तीन महिने बंद होती. कंपनीत कामगार व व्यवस्थापनात संघर्ष सुरू आहे. कथित मारहाणीनंतर तक्रार दाखल होईपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. कामगारांचे पैसे द्या, असे उदयनराजे म्हणाले होते. त्याचा राग आल्याने खोटी तक्रार दिली आहे. राजकीय विरोधकांनी गैरफायदा घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, असा युक्तिवाद मांडण्यात आला.

Web Title: complaint against mp udyanraje bhosale