तक्रार पेटीचे पडसाद सोशल मीडियावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

शेतकऱ्यांसाठी तक्रारपेटी लावण्याचे आवाहन

शेतकऱ्यांसाठी तक्रारपेटी लावण्याचे आवाहन
सोलापूर - मागील आठवड्यात सरकारने शाळांमध्ये तक्रारपेटी लावण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरवात झाली आहे. ज्याप्रमाणे शाळांमध्ये तक्रार पेटी लावण्याचे आदेश दिले आहेत, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठीही तक्रार पेट्या लावण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभारावर सोशल मीडियाने विश्‍वास दाखविला आहे. पण, फक्त शाळेतच तक्रार पेटी का? असा प्रश्‍नही उपस्थित केला आहे. ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या सर्वच ठिकाणी तशा पेट्या लावण्याचेही आवाहन केले आहे. त्याचबरोबर तलाठी सज्जा, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त ते मंत्रालय याठिकाणी तक्रार पेट्या का नकोत? फक्त शाळेतच त्या का हव्यात? असेही प्रश्‍न विचारले आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरही तक्रार पेट्या अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून तुमच्याबद्दल लोकांच्या काय तक्रारी आहेत हे तरी आम्हाला कळू द्या. त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी लोकपाल, कोर्टाचा प्रतिनिधी व मुख्यमंत्र्यांसमोर उघडण्याचेही आवाहन केले आहे.

तक्रार पेटी लावायचीच असेल तर ती शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलिस विभाग या प्रत्येक ठिकाणी लावा. मग बघा कसा तक्रारीचा पाऊस पडतो ते, असाही उल्लेख त्यामध्ये केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकायला तक्रार पेटी बसविण्याचेही आवाहन केले आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कडेगाव - आघाडी शासनाच्या काळात राज्यातील बंद उद्योगांना नवसंजीवनी देण्यासाठी विशेष अभय योजना सुरू केली होती. योजनेची मुदत...

11.36 AM

मिरज - जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे सर्वेक्षण तीन वर्षांपूर्वी झाले; त्याचे गॅझेट मात्र अद्याप झालेले नाही. या सर्वेक्षणाचे...

11.06 AM

कोल्हापूर -  कर्जमाफी योजनेतील नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी घेतलेल्या पीक कर्जाचीही परतफेड करावी लागणार...

10.45 AM