एकवीस ग्रामपंचायतींच्या मालमत्ता जप्त करा; औद्योगिक न्यायालय

Confiscate the property of twenty-one gram panchayats; Industrial Court
Confiscate the property of twenty-one gram panchayats; Industrial Court

सांगली ः कामगारांच्या थकीत देण्यासाठी जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालयाने दिले आहेत. सुमारे 40 लाख रुपयांचे हे वसुली दावे आहेत. ही माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस ऍड. राहुल जाधव यांनी दिली. 

त्यांनी दिलेली माहिती अशी, की किमान वेतन कायदा डावलणे, फरकाची रक्कम देण्यास टाळाटाळ करणे याप्रकरणी संघटनेने 37 कर्मचाऱ्यांच्यावतीने दावे दाखल केले होते. सांगलीच्या न्यायालयात थकीत रकमा देण्याचे आदेश दिले होते. ग्रामपंचायतींनी औद्योगिक न्यायालय व उच्च न्यायालयात दाद मागितली नाही. देणीही दिली नाहीत.

त्यामुळे संघटनेने वसुली दावे केले. त्यानुसार न्यायालयाने ग्रामपंचायतींना देणी देण्यासाठी समज दिली. तरीही पैसे न भरल्याने न्यायालयाने ग्रामपंचायतींच्या मालमत्तांच्या जप्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार तहसिलदारांनी संबंधित ग्रामपंचायतींना जप्तीची नोटीस बजावली आहे. काही प्रकरणे वसुलीसाठी तालुका दिवाणी न्यायालयाकडे वर्ग केली आहेत. लवकरच जप्तीची कारवाई होणार आहे. 


गावे, कर्मचारी, त्यांची रक्कम 
विठुरायाचीवाडी, प्रकाश कांबळे (2,65,445), ढोलेवाडी-राजाराम ढोले (234101), देशिंग-अनिल जोशी (1,88,845), रामानंदनगर-चंद्रकांत कांबळे (27,197), मधुकर कुरणे (33,306), श्रीनिवास कांबळे (32,903), शुभांगी डवरी (46,717), बुधगाव-वंदना होवाळे (131507), शोभा लांडगे (131507), लक्ष्मी कांबळे (132307), शांताबाई कांबळे (132307), शेवंताबाई ऐवळे (132307), अरुणा कांबळे (132307), मालन बनसोडे (132307), राजाराम कदम (70734), विठ्ठल काळे (89147), ललीता होवाळे (174511), कर्नाळ- अरुण पाटील (111070), जितेंद्र माने (183830),

गावे, कर्मचारी, त्यांची रक्कम 

माधवनगर-सुरेश खंडकर (81012), बेडग-गोदाबाई भोसले (90297), म्हैसाळ-कृष्णा शिंदे (86515), कडेपूर-दिनकर वाघमारे (56100), सावर्डे-जगुताई माने (88595), नाटवडे-बबन कांबळे (187074), कौठुळी-नारायण वाघमारे (99312), महादेव साळुंखे (81012), धावडवाडी-बाळू केंगार (89556), तांबवे-संजय गायकवाड (94677), शेखरवाडी-बबन शेखर (175335), देवनगर-संदीप पाटोळे (101133), भांबर्डे-रामचंद्र मंडले (120985), प्रतापपूर-शाम हेगडे (140475), सिंगनहळ्ळी-गजेंद्र सुतार (64827), शेगाव-ताराप्पा होवाळ (63656), 

संपादन : युवराज यादव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com