सहायक आयुक्तांना दमदाटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी महापालिकेच्या शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या बैठकीत सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्याशी एकेरी भाषेत हुज्जत घालत त्यांना दमदाटी केली. संतप्त झालेल्या खाडे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली. सायंकाळी हा प्रकार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापर्यंत गेला. 

प्रभाग समितीच्या बैठकीत आणि त्यानंतर सभापती अफजल फिरजादे यांच्या केबिनमध्ये बोलावून गवंडी यांनी दमदाटी केल्याचे खाडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयात आज बैठक सुरू होती. त्याला प्रकाश गवंडी यांनी हजेरी लावली होती. 

बैठकीला अनेक अधिकारी अनुपस्थित होते. याचा राग प्रकाश गवंडी यांना आला. त्यांनी कामाबद्दल कोणाला विचारणा करायची? असा सवाल करत वाद घालण्यास सुरवात केली. त्यांनी सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्याशी एकेरी भाषेत हुज्जत घालत त्यांना दमदाटी केली. बैठक संपल्यानंतर प्रभाग समिती सभापती फिरजादे यांच्या केबिनमध्ये त्यांना बोलावून घेतले. तेथे त्यांना धमकी दिली. यामुळे खाडे संतप्त झाले. त्यांनी याबाबतची लेखी तक्रार आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर हा तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यापर्यंत पोचला. 

पोलिस ठाण्यात गवंडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असे वातावरण होते. पण तसे झाले नाही. महापालिका पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी नगरसेवकांनी तेथे धाव घेतली. त्यांनी खाडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र रात्री थेट वरिष्ठ पातळीवरच पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबतचा फोन आला. त्यामुळे रात्री उशिरा राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक आदिल फरास, विनायक फाळके आदी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर थांबून होते. 

प्रभागातल्या कामासाठी मी विचारणा करत होतो. या बैठकीत अनेक अधिकारी गैरहजर होते. वारंवार असे प्रकार घडतात. प्रभागांतील कामे गतीने व्हावीत असाच माझा आग्रह होता. मी खाडे यांना कोणत्याही प्रकारची दमदाटी केली नाही. एकेरी भाषेतही बोललो नाही. माझ्याविरोधात चुकीची तक्रार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
-  प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक 

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून जिल्ह्यातील महावितरणची सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे...

05.15 PM

सोलापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी शासनाने पोर्टल तयार केले आहे. मात्र, ते पोर्टल "एरर'...

05.06 PM

सांगली - पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना धू धू...

05.06 AM