'डेअरी फार्म मॅनेजमेंट ते दूधप्रक्रिया उद्योग मार्गदर्शन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 मे 2017

गोठ्याला आणि दूधप्रक्रिया युनिटला शिवारफेरी असेल. प्रतिव्यक्ती आठ हजार रुपये शुल्क आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्‍यक आहे. संपर्क: 8605699007

कोल्हापूर : दुधाळ जनावरांच्या खरेदीपासून त्यांचे गोठा व्यवस्थापन, दूध उत्पादनवाढ ते दूधावर प्रक्रिया करून तयार करता येणाऱ्या विविध पदार्थांबाबत सविस्तर माहिती करून देणारे 'मॉडर्न डेअरी फार्म मॅनेजमेंट ते दूधप्रक्रिया उद्योग तंत्र' विषयाचे पाच दिवसीय प्रशिक्षण प्रगत प्रमाणपत्र प्रशिक्षण ता.19 ते 23 मे दरम्यान 'सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'च्या वतीने शिवाजी उदयमनगर येथील सकाळ कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणात पहिल्या दोन दिवसांत गाई-म्हशी खरेदी करताना घ्यावयाची काळजी,जनावरे व्यवस्थापनात नोंदीचे महत्त्व, पोषक खाद्य व्यवस्थापन, वर्षभराचे चारापीक नियोजन, मुरघास तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसायातील यांत्रिकीकरण, कमी खर्चात चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक्‍स तंत्र, पशुखाद्यात ऍझोला वापर, मुक्त गोठा पद्धत, आजार, लसीकरण आणि नंतरच्या तीन दिवसांत दूधापासून बनणारे विविध पदार्थ, प्रक्रियेसाठी आवश्‍यक यंत्रसामग्री, उद्योगासाठी भांडवल, अन्नप्रशासनाचे परवाने, बॅंक फायनान्स इ.विषयी मार्गदर्शन होईल. गोठ्याला आणि दूधप्रक्रिया युनिटला शिवारफेरी असेल. प्रतिव्यक्ती आठ हजार रुपये शुल्क आहे. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्‍यक आहे. संपर्क: 8605699007

- प्रशिक्षण तारीख : 19 ते मे 23
- वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहा
- ठिकाण : सकाळ पेपर्स प्रा.लि. कार्यालय, शिवाजी उदयमनगर, पार्वती चित्रमंदीराजवळ, कोल्हापूर
- शुल्क: प्रतिव्यक्ती आठ हजार रुपये (चहा, नाश्‍ता, जेवण आणि प्रशिक्षण साहित्यासह)
- प्रवेश : फक्त 30 व्यक्तींसाठी
- संपर्क: 8605699007

प्रशिक्षणात मार्गदर्शन होणारे विषय:
- जातीवंत दूधाळ गाई-म्हशींची निवड व त्यांचे शास्त्रोक्त संगोपन
- गाई-म्हशींतील वंध्यत्व, उपाय, आजार व लसीकरण
- जनावरांचा खाद्य पोषण व्यवस्थापन
- मुक्त गोठा पद्धतीचे फायदे
- चारा उत्पादनाचे हायड्रोपोनिक तंत्रज्ञान, ऍझोला उत्पादन
- दूधापासून बनविता येणारे विविध पदार्थ
- आवश्‍यक मशीनरी, प्रोजेक्‍ट रिपोर्ट
- प्रॉडक्‍ट मार्केटींग, ब्रॅन्डींग, अन्नप्रशासनाचे परवाने
- बॅंक फायनान्स, आवश्‍यक कागदपत्रे