साऱ्यांचे लक्ष आता भगवानगडाकडे!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 ऑक्टोबर 2016

नगर - भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद विकोपाला गेल्यामुळे गडावरील तणाव कायम आहे. दसरा मेळावा होऊन त्यात परंपरेनुसार मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचे भाषण होणार की नाही? गडावरील वाद विकोपाला जाईल, की शांततेत दसरा पार पडेल, याकडे भाविकांसह राज्यभरातील राजकीय लोकांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, भगवानगडावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.

नगर - भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद विकोपाला गेल्यामुळे गडावरील तणाव कायम आहे. दसरा मेळावा होऊन त्यात परंपरेनुसार मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांचे भाषण होणार की नाही? गडावरील वाद विकोपाला जाईल, की शांततेत दसरा पार पडेल, याकडे भाविकांसह राज्यभरातील राजकीय लोकांचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, भगवानगडावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी केली आहे.

बीड व नगर जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेला भगवानगड राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. १९५१मध्ये भगवानबाबांनी स्थापन केलेल्या या गडावर धौम्यऋषींचे तपस्थान असल्याने, पूर्वी भगवानगडाला धौम्यगड संबोधले जायचे. दर वर्षी दसऱ्याला गडाचा वर्धापन दिन साजरा केला जातो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथे साधारण पंचवीस वर्षांपूर्वी दसरा मेळावा घेण्याची परंपरा सुरू केली. तेव्हापासून दर वर्षी मुंडे यांचे भाषण होत असे. त्यांच्या निधनानंतर मंत्री पंकजा मुंडे-पालवे दसरा मेळाव्यात भाषण करू लागल्या. मात्र साधारण दहा महिन्यांपूर्वी भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी गडावरील दसरा मेळाव्यात कीर्तनाशिवाय कोणाचेही भाषण होणार नाही, असे जाहीर केले. सुरवातीला पंकजा यांनी त्याबाबत भाष्य केले नाही; मात्र आठ दिवसांपासून गडावरील दसरा मेळावा अधिक चर्चेत आला. 

गडावर मेळाव्याच्या नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत गोंधळ झाला. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीतील पंकजा यांच्या संभाषणाची आणि काल (शनिवारी) महंत नामदेवशास्त्री यांनी एका पत्रकाराशी केलेल्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘पंकजा मुंडे दसरा मेळाव्याला गडावर भाषण करणारच,’ असे कार्यकर्त्यांनी जाहीर केले असून, त्यांना भाषण करू द्यावे, अशी मागणी पंचवीस गावांच्या सरपंचांनी केली. मात्र ‘पंकजा मुंडे यांनी गडावर येऊन दर्शन घेऊन जावे. फार तर गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन भाषण करावे; मात्र गडावर भाषण करता येणार नाही,’ असे डॉ. नामदेवशास्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

नामदेवशास्त्री निर्णयावर ठाम आहेत. त्याबाबत जिल्हा प्रसासनालाही पत्र देऊन त्यांनी साऱ्या बाबी प्रशासनावर सोपविल्या आहेत. गडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांचे भाषण होणार की नाही, याकडे राज्यभरातील भाविकांसह राजकीय लोकांचेही लक्ष लागले आहे.

अनेक मंत्रीही येण्याची शक्‍यता 
नामदेवशास्त्री व मुंडे वादात भारतीय जनता पक्षाने नेत्या म्हणून मुंडे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. महादेव जानकर यांनीही मुंडे यांच्या बाजूने असल्याचे सांगितले. याशिवाय अन्य नेते, मंत्रीही त्यांच्या मदतीला येण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. बीडच्या खासदार प्रीतम खाडे दहा हजार दुचाकींची रॅली काढणार आहेत. गडावरच ग्रामपंचायतीच्या जागेत मेळावा घेतला जाण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - 'गण गण गणात बोते' आणि विठुनामाचा जयघोष करीत मंगळवारी शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शहरात आगमन झाले....

11.12 AM

म्हसवड - विरळी (ता. माण) नजीकच्या कापूसवाडी येथे उघड्या बोअरवेलमध्ये पडलेल्या पाच वर्षांंच्या मंगेश जाधव अखेर श्वास गुदमरून...

08.30 AM

कोल्हापूर - मशीन माणसाला टेकओव्हर करत असताना आता पुन्हा "शिक्षण हेच भवितव्य' हा राजर्षी शाहूंचा विचार देशभरात रुजणे आवश्‍यक आहे....

04.33 AM