खुपसंगी गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

खुपसंगी गावचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा खुपसंगी गावाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला.

चालू दुष्काळाची भयानकता मोठी असून मुला प्रमाणे वाढलेल्या फळबागा जगवायच्या कशा या चिंतेने गावकऱ्यांची झोप उडाली. याचा विचार करण्यासाठी चारशे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या संकटावर विचारविनिमय करण्यासाठी आज रविवारी सकाळी नऊ वाजता मरीआई मंदिरात बैठक घेतल्यावर हा निर्णय घेतला. या बैठकीस खुपसंगी गावचे सरपंच नानासो हेगडे, उपसरपंच औदुंबर चौगुले, ग्रामपंचायत सदस्य संभाजी भोसले, दत्ता मरीआईवाले, ज्ञानेश्वर माळी, मोहन वाले, सोसायटी चेअरमन बाळासाहेब चौगुले, माजी सरपंच श्रीपती चौगुले, कुशाबा पडवळे, शहाजहान पटेल, तानाजी चौगुले, बापू शेळके, अण्णा माळी, सेंद्रिय गटाचे अध्यक्ष दिनेश लेंगरे, गणपत लेंडवे, बाजीराव मरीआईवाले, विक्रम पांढरे, माजी सैनिक महादेव चौगुले, तुकाराम माळी, सुखदेव चौगुले आदीसह 400 शेतकरी उपस्थित होते.

तालुक्यातील खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी अतिशय कष्टाने 700 एकर डाळिंब व भाजीपाला पिके पावसाच्या पाण्यावरच पिकवली जातात पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून वर्षभर जपून वापरायचे अत्यंत कमी पाण्यात येथील शेतकऱ्यांनी निर्यातक्षम डाळिंब व गुणवत्तापूर्ण भाजीपाला पिकविला. गाव विषमुक्त शेतीच्या दृष्टीने काम करू लागले. पण दर दोन वर्षातून पडणारा दुष्काळ व शासनाची मिळणारी तुटपुंजी मदत यामुळे शेतकऱ्यांची नेहमीच घुसमट होत आली. गावात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असून सध्या चाऱ्याअभावी मातीमोल किंमतीने जनावरे विकावी लागत आहेत. याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्राध्यापक घनश्याम चौगुले यांनी केले.

शासनाने अनेक तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले पण जी गावे फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत अशा दुष्काळी गावांचा वेगळा विचार शासन का करीत नाही. लाभक्षेत्राबाहेरील व फक्त पावसावर अवलंबून असणारी गावे शासनाने प्रथम जाहीर करावीत जी गावे उजनी धरणाच्या च्या लाभक्षेत्रात येतात तसेच भीमा नदीच्या काठावर आहेत अशा गावा बरोबर निव्वळ दुष्काळी गावांचा विचार न करता अशा दुष्काळी गावांना वेगळा दर्जा देऊन उध्वस्त होणारी  शेती व तेथील पशुधनाला वाचवण्यासाठी शासनाने अशी पावसावर अवलंबून असणारी गावे निवडून त्यांना कोरडवाहू गावे म्हणून जाहीर करावे. 
- अंकुश पडवळे, शेतकरी

44 गावांतील शेतकऱ्यांची बैठक सोमवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्राथमिक शिक्षक सोसायटी, मंगळवेढा मध्ये ठेवण्यात आली असून यात होणारा निर्णय ही महत्त्व पुर्ण ठरणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com