निवी, घोटीलमध्ये बिबट्याचा मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

ढेबेवाडी - निवी व घोटील परिसरात बछड्यांसह बिबट्या मुक्कामी आहे. त्याने तीन दिवसांत तीन शेळ्या, बोकडासह तीन कुत्र्यांचाही फाडशा पाडला आहे. गावाजवळ रस्त्यावर एकमेकांशी खेळणारे बछडे व रस्त्यालगतच्या उंच गवतात लपून त्यांच्यावर लक्ष ठेवणारी मादी अनेकांनी पाहिली आहे. 

परिसरात बिबट्याचा संचार वाढला आहे. मध्यंतरी भोसगावजवळ प्राथमिक शाळा, अंगणवाडी परिसरात बिबट्याचा मुक्काम होता. जानुगडेवाडीत कदमआवाड येथे तो वाढला. त्याने पाळीव व भटक्‍या कुत्र्यांच्या फाडशा पाडला. तोच बिबट्या त्याच्या बछड्यांसह निवी, कसणी, घोटील परिसरात आहे.

त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहेत. सलग आठवडाभर वर्दळीच्या रस्त्यावरून बिबट्याचे बछड्यांसह वावरणे लोकांना घाबरवून सोडत आहे. ढेबेवाडी-कसणी रस्त्यावर एकमेकांशी खेळणारे बछडे आणि रस्त्याजवळच्या गवतात बसून त्यांच्यावर लक्ष ठेवणारी मादी पाहिल्याचे अनेकांनी सांगितले.

निवीतील किसन निगडेकर यांच्या कुत्र्यासह अन्य दोन मोकाट कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला. तेथीलच आनंदा पाटील यांची चरायला सोडलेली शेळी त्याने फस्त केली. पारूबाई मस्कर यांच्या शेळीच्या बाबतीतही असेच झाले. मारुती साबळे यांची शेळी, तुकाराम साबळे यांचा बोकड, घोटील येथील एका शेळीचाही बिबट्याने फडशा पाडल्याचे वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील यांनी सांगितले. वन विभागाचे डी. के. जाधव, श्री. बेंद्रे, धनाजी पवार, मारुती पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

कदमवाडीच्या शिवारातही बिबट्याचे दर्शन
मल्हारपेठ - कदमवाडी जानाई मंदिर परिसरात तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. जानाई देवी मंदिराच्यामागे बिबट्याने कुत्र्याचाही फडशा पाडला आहे. त्यावेळी लोकांनी बिबट्याला पांगवण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरापर्यंत तो प्रकार सुरू होता. या प्रकाराची माहिती देऊनही वन विभागाचे कर्मचारी तिकडे फिरकले नाहीत. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, यासाठी ग्रामस्थ आग्रही आहेत.