एकाच वेळी नवरात्रोत्सव अन्‌ मोहरमची धूम...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक - दसरा आणि कत्तलरात्रीचा सोहळा एकाच दिवशी 
कोल्हापूर - आदिमायेचा जागर मांडणारा नवरात्रोत्सव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतीक असणाऱ्या मोहरमची धूम यंदा एकत्रित अनुभवायला मिळणार आहे. शनिवारी (ता. 1) घटस्थापना होणार आहे आणि रविवारी (ता. 2) कुदळ पडून मोहरमच्या सणाला प्रारंभ होणार आहे. एकूणच एकीकडे रास-दांडिया, गरबाची धूम आणि दुसरीकडे पंजेभेटीचे सोहळे असा अनोखा धार्मिक आणि सांस्कृतिक मिलाफ घडणार आहे. दरम्यान, महालक्ष्मी मंदिरासह नवदुर्गा मंदिरांत नवरात्रोत्सवाची तर विविध दर्गा आणि मशिदीत मोहरमची तयारी अंतिम टप्प्यात आहे. 

घटस्थापनेनंतर 6 ऑक्‍टोबरला ललिता पंचमी, 8 ऑक्‍टोबरला जोतिबाचा जागर, 9 ऑक्‍टोबरला दुर्गाष्टमी आणि 11 ऑक्‍टोबरला विजयादशमी (दसरा) साजरा होणार आहे. रविवारी कुदळ पडल्यानंतर 3 ऑक्‍टोबरला पंजे प्रतिष्ठापना होईल. त्यानंतर सातव्या दिवसापासून पंजेभेटीला प्रारंभ होईल. 11 ऑक्‍टोबरला शाही दसरा सोहळा होईल आणि त्याच दिवशी रात्री कत्तलरात्रीचा सोहळा होईल. 12 ऑक्‍टोबरला ताबूत विसर्जन होईल. दोन्ही सणांच्या पर्वाला एका दिवसाच्या फरकाने प्रारंभ होणार असून, शहरातील अनेक ठिकाणी एकीकडे दुर्गामातेचा मंडप आणि समोर मानाचा पंजा असे चित्र असेल. 

महालक्ष्मीची अकरा दिवस सालंकृत पूजा 
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवात यंदा अकरा दिवस विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. याबाबतची माहिती दिवाकर ठाणेकर, संजय मुनीश्‍वर यांनी दिली. विविध रूपांतील पूजा अशी - शनिवारी (ता. 1)- सिंहासनारूढ- श्री देवी भक्तांच्या उपासना स्वीकारत सिंहासनावर विराजमान होते आणि भक्तांना आशीर्वाद देणारी सालंकृत पूजा. 
- रविवारी (ता. 2)- मयूरवाहिनी पूजा- नवशक्तिदेवतांमधील एक शक्तिदेवता. 
- सोमवारी (ता. 3) - शैलपुत्री पूजा- नवदुर्गांमधील व नवरात्रोत्सवातील प्रथम देवता. 
- मंगळवारी (ता.4)- सिंहवाहिनी- महाभयांचा नाश करणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी देवता. 
- बुधवारी (ता. 5)- गरूडवाहिनी- कोल्हासुर दैत्यास भय निर्माण करणारी देवी. 
- गुरुवारी (ता. 6)- गजारूढ- श्री महालक्ष्मीदेवी त्र्यंबोली भेटीसाठी जातानाची पूजा. 
- शुक्रवारी (ता. 7)- महा त्रिपुरसुंदरी- दशमहाविद्येतील लोकप्रिय देवी. 
- शनिवारी (ता. 8)- बाला त्रिपुरसुंदरी- विद्याउपासनादेवी महात्रिपुरसुंदरीदेवीचे कुमारी स्वरूप. 
- रविवारी (ता. 9)- महिषासुरमर्दिनी- महिषासुर दैत्याचा नाश करणारी पारंपरिक पूजा. 
- सोमवारी (ता. 10)- गायत्रीदेवी- शक्ती उपासना देवी. 
- मंगळवारी (ता. 11)- रथारूढ- सीमोल्लंघनासाठी निघालेली देवी रूपातील पूजा.