स्व. सुर्यभान तांबे स्मरणार्थ शैक्षणिक व धार्मिक संस्थांना देणग्या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

आश्वी (नगर) : स्वतःसाठी कधीही अपेक्षा न ठेवता सातत्याने समाजासाठी समाजकार्य करण्यात आपले आयुष्य स्व. सुर्यभान तांबे यांनी खर्च केले. वैयक्तीक मागणी कधीच केली नाही. त्यांनी घेण्यापेक्षा इतरांना देण्याचेच काम केले, त्यांचा हा सामाजिक कार्याचा विचार घेवूनच आपणा सर्वांना पुढे जायचे असल्याचे प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. संगमनेर तालुक्यातील चिंचपूर येथे स्व. सूर्यभान तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात ते बोलत होते.

विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे यांनी त्यांचे वडील स्व. सुर्यभान तांबे यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली मंदीर ट्रस्ट करिता एक लाख अकरा हजार रूपये, लोणी येथील श्री वरद विनायक सेवाधाम ट्रस्ट, दाढ येथील संत मुकुंददास महाराज ट्रस्ट, खंडोबा महाराज मंदिर जीर्णोध्दारासाठी तसेच चिंचपूरच्या प्रवरा माध्यमिक विद्यालयाला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते देणगी देण्यात आली.

ढोक महाराज म्हणाले की, माझे आध्यत्मिक जीवन फुलविण्यात स्व. सूर्यभान तांबे व त्यांच्या परिवाराचे मोठे योगदान आहे. तर उध्दव महाराज यांनी शेती बरोबरच धार्मिक व सामाजिक प्रवृत्ती जोपासून, समाजाची सेवा करणारी माणसे अभावानेच जन्माला येतात. धार्मिक व सामाजिक कार्यासाठी सातत्याने दान धर्म करणारे, घरी आलेला मनुष्य कधीही विन्मुख जावू न देणारे स्व. तांबे म्हणूनच आठवणीत राहतात.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक, ह.भ.प.उध्दव महाराज नेवासेकर, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, आर. बी. राहाणे, गणेशचे अध्यक्ष प्रताप जगताप, प्रवरा बँकेचे संचालक प्रमोद राहाणे, जी. के. बकाल, दिगंबर कुलकर्णी तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: donation to schools on the remembrance of let suryabhan tambe