मार्कंडेय नदीत पडल्याने एकाचा बुडून मृत्यू

पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
drowned in Markandey River belgaum case registered Kakati police station
drowned in Markandey River belgaum case registered Kakati police stationsakal

बेळगाव : मार्कंडेय नदीत पडल्याने एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता. २६) सायंकाळी होनगा नजीक उघडकीस आली आहे. दीपक विजय जाधव (वय ३२, रा. कंग्राळी बुद्रुक) असे त्याचे नाव असून याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आज सायंकाळीच्या दरम्यान होनगा येथील मार्कंडेय नदीच्या ब्रिजखाली नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह नागेश शट्टू नाईक (रा. होनगा) यांना आढळून आला. त्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर काकतीचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ. पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता.

नदीतील माशानी त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. त्यामुळे ओळख पटविणे कठीण झाल्याने पोलिसांनी अनोळखी अशी नोंद करून घेऊन कायदेशीर कारवाई पूर्ण केली. मात्र, रात्री सदर मृतदेह कंग्राळी बुद्रुक येथील दीपक विजय जाधव यांचा असल्याचे स्पष्ट झाले, दीपक हा मद्यपी होता तसेच वरचेवर तीन-चार दिवस घरातून कोणालाही न सांगता बाहेर जात. होता शुक्रवार (ता. २७) सायंकाळी तो घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर पुन्हा परत आलाच नाही. नदीच्या ब्रिजवर मद्यप्राशन केल्यानंतर पाणी पिण्यासाठी जात असताना किंवा तोल जाऊन पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच तो एका पायाने अपंग असल्याने त्याला पोहता येत नाही. जिल्हा रुग्णालयातील शवागृहात शल्यचिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com