संकरित भाजीपाला खाल्यामुळे जडतात मोठे रोग

संकरित भाजीपाला खाल्यामुळे जडतात मोठे रोग

मोहोळ- संकरीत फळे भाजीपाला खाण्यामुळे मानवाला अनेक महागड्या शारीरीक रोगाला सामोरे जावे लागत आहे, शारिरीक हानी बरोबर अर्थिक हानी ही मोठया प्रमाणात होत आहे, या सर्वावर उपाय किंवा पर्याय म्हणुन पापरीसह मोहोळ तालुक्यात शेंद्रीय शेतीचे फॅड वाढत आहे. तालुक्यातील विविध भागात सुमारे शंभर एकरावर शेंद्रिय शेती केली जात आहे. टोमॅटो, कारले, ऊस, बोर, केळी ही पिके त्या माध्यमातुन घेतली जात आहेत.

सध्या सर्वांचीच झटपट पैसे मिळवीण्याची वृती वाढली आहे, त्यात शेतकरी तर कसा मागे राहिल. मात्र रासायनिक खते व वेगवेगळी घातक औषधे फवारणी केल्या शिवाय ती येत नाहीत, त्यापासुन अर्थाजन जरी चांगले होत असले तरी कर्करोगासारख्या रोगाला सामोरे  जावे लागत आहे. यावर उपाय म्हणुन पापरी (ता. मोहोळ) येथील राजेंद्र माळी, विलास टेकळे, सुनील ढोले या युवा शेतकऱ्यांनी शेंद्रीय शेती यशस्वी केली आहे. मात्र ,त्यासाठी महत्वाचा असणारा घटक म्हणजे देशी गाय दारात असणे गरजेचे आहे. शेंद्रीय शेतीमुळे देशी गाय पाळणे ही संकल्पना साध्य होऊ लागली आहे. प्रत्येक दोन कुटुंबामागे एक देशी गाय हे समीकरण त्यातुन साध्य झाले आहे.

शेंद्रीय शेतीच्या माध्यमातुन उत्पादीत केलेल्या शेतीमालाला पुणे, बार्शी, सोलापूर या ठिकाणच्या मॉल धारकाकडुन मोठी मागणी आहे, तर शेंद्रीय उत्पादने खरेदीकडे सर्वसामान्याचा कल वाढता आहे. नेहमीच्या दरापेक्षा शेंद्रीय शेतीच्या माध्यमातुन उत्पादीत मालाला दिडपट दर जादा मिळत आहे, ज्या कुटुंबात शेंद्रीय औषधे तयार करण्याची माहिती आहे त्या कुटुंबात तर झीरो बजेट शेती ही संकल्पना आपोआप राबविली जात आहे. मात्र, शेंद्रिय शेतीला घरातुनच प्रथम मोठा विरोध होत असल्याचे वरील तिघांनी सांगीतले.

शेंद्रिय शेतीतील पिकावर फवारणी साठी गुळ, बेसनपीठ, देशी गायीचे गोमुत्र, शेण व खराब फळे लागतात. एकुण परिस्थीतीचा विचार केला तर चiगल्या आरोग्यासाठी शेंद्रीय शेती वाढत आहे, तिला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com