पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने दोन बालकांसह सहा जण जखमी

बाळासाहेब कांबळे
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

शनिवारी सायंकाळच्या सुमारास नमाज पढण्यासाठी जात असताना भगतसिंग रोडवर अचानक समोर आलेल्या भटक्या कुत्र्याने अय्यान याचा चावा घेतला. कुत्र्याने अय्यानच्या बरगडिचा लचका तोडला आहे.

हुपरी (जि . कोल्हापुर) : रेंदाळ (ता . हातकणंगले) येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने दोन लहान बालकांसह सहा जण जखमी झाले. यामध्ये एका बालिकेचा समावेश आहे. जखमी बालकांपैकी अय्यान यासिन मुजावर व बुशरा वाहिद मोमिन (दोघेही रा . रेंदाळ) या दोघाची प्रकृती गंभीर असुन त्यांच्यावर कोल्हापुरातील शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शनिवारी सायंकाळच्या सुमारास नमाज पढण्यासाठी जात असताना भगतसिंग रोडवर अचानक समोर आलेल्या भटक्या कुत्र्याने अय्यान याचा चावा घेतला. कुत्र्याने अय्यानच्या बरगडिचा लचका तोडला आहे. तर शिवाजी चौक येथे बुशरा या बालिकेचा चावा घेतला. त्यानंतर बस स्थानक परिसर, शाहु नगर आदि भागात या कुत्र्याने धुमाकूळ घालत सहा ते सात जणांचा चावा घेतला. अन्य जखमींची नावे समजू शकली नाहीत.
 

Web Title: esakal kolhapur news

टॅग्स