मोदी सरकारविरोधात अण्णा उतरणार रस्त्यावर

मार्तंडराव बुचुडे
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

आंदोलन जानेवारी महिन्यात असले तरी आंदोलनासाठी जागा पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच या पुर्वीच्या आंदोलनात ज्या चुका झाल्या त्या या आंदोलनात घडणार नाहीत यासाठी आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते पारखून घेतले जाणार आहेत. त्यांच्याकडून प्रतीज्ञापत्र घेतले जाणार आहे त्यामुळे आता अशा आंदोलनातून कोणीही मुखयमंत्री राज्यपाल किंवा मंत्री होणार नाही तसेच जर एखादा कार्यकर्ता निवडणुकीत ऊभा राहिला तर त्याला न्यायालयात खेचले जाईल असेही हजारे म्हणाले.

राळेगणसिद्धी : लोकपाल, लोकायुक्त, राईट टू रिकॉल तसेच शेतक-यांच्या विविध प्रश्नांच्या न्याय मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे सरकार विरोधात तीव्र देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे कार्यकर्त्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय शिबिरात आज(ता. 8) समारोप प्रसंगी राळेगणसिद्धी येथे जाहीर केले. हजारे यांनी सरकारविरूद्ध आंदोलनाचे रणशिंग फुंकले.
 
राळेगणसिद्धी येथे गेले दोन दिवस कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय शिबीर सुरू होते. शिबीरासाठी देशभरातील अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते. शिबीराचा आज समारोप झाला. या वेळी हजारे यांनी आंदोलनाचा निर्णय जाहीर केला. आंदोलनापुर्वी देशभरातील कार्यकर्त्यांना जागविण्यासाठी व आपल्या मागण्यांच्या जनजागृतीसाठी ते प्रचारसभा घेणार आहेत. या वेळी प्रत्येक राज्यात जन आंदोलनाच्या शाखा स्थापन करणार असल्याचेही हजारे यांनी सांगीतले.

आंदोलन जानेवारी महिन्यात असले तरी आंदोलनासाठी जागा पाहण्याचे काम सुरू आहे. तसेच या पुर्वीच्या आंदोलनात ज्या चुका झाल्या त्या या आंदोलनात घडणार नाहीत यासाठी आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते पारखून घेतले जाणार आहेत. त्यांच्याकडून प्रतीज्ञापत्र घेतले जाणार आहे त्यामुळे आता अशा आंदोलनातून कोणीही मुखयमंत्री राज्यपाल किंवा मंत्री होणार नाही तसेच जर एखादा कार्यकर्ता निवडणुकीत ऊभा राहिला तर त्याला न्यायालयात खेचले जाईल असेही हजारे म्हणाले.
 
सध्याच्या सरकारवर टिका करताना अण्णा म्हणाले, हे सरकार घंमेडी आहे. त्यांना वाटते आपले कोणीच काही करू शकत नाही. मात्र त्यांना हे माहीत नाही की, संसदेपेक्षा जनसंसद मोठी आहे. जनशक्ती त्यांना ऊलथून टाकल्याशिवाय राहणार नाही. सध्याचे सरकार हुकुमशाही वृत्तीचे आहे असे सांगतानाच इंग्रज गेले परंतू लोकतंत्र आले नाही अशी टीका यावेळी हजारे यांनी सरकारवर केली.

लोकपालच्या आंदोलनासाठी आजपासूनच सुरूवात झाल्याचे सांगताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली तरी लोकपाल कायदा अस्तित्वात आला नाही. लोकपाल कायद्याच्या अंमलवजावणीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला  परंतू केंद्र सरकार कोणताही प्रतिसाद देत नसल्याने तसेच राईट टू रिजेक्ट व शेतक-यांच्या शेतमालाला बाजारभाव नाही त्यासाठी स्वमीनाथन आयोगाची अंमलबाजावणी करावी या आणि इतर मागण्यांसाठी सरकार विरोधात दिल्ली येथे तीव्र आंदोलन करण्याचे हजारे यांनी जाहीर केले.
 
या शिबीरास राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगड, उडिसा, कर्नाटक, तेलंगना, मध्य प्रदेश, हरियाना, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.