स्वाभीमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

राज्यातील भाजपा सरकारचा सहयोगी पक्ष 'स्वाभीमानी शेतकरी संघटना' सरकारच्या कामकाजावर नाखुश असून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

कोल्हापूर- राज्यातील भाजपा सरकारचा सहयोगी पक्ष 'स्वाभीमानी शेतकरी संघटना' सरकारच्या कामकाजावर नाखुश असून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. सरकारवर नाराजी व्यक्त करुन त्यांनी सरकारमधून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत.

शेतकऱ्याच्या संपाबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, संप 100 टक्के यशस्वी झाला आहे, सरकारने त्याची दखल घ्यावी. तसेच शेतकरयांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच राजू शेट्टी यांनी सांगितलं.