...तर जनता एसटी कर्मचाऱ्यांना ठोकून काढेल - चंद्रकांत पाटील

chandrakant patil
chandrakant patil

कोल्हापूर - दिवाळसणाच्या मुहूर्तावरच एस.टी. बसच्या संपामुळे जनतेचे हाल होत असतील तर जनता अशांना ठोकून काढेल या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी संपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्यास ,चर्चा करण्यास सरकार समर्थ आहे मात्र  शासकीय कर्मचाऱ्यांना संप करण्याचा आणि जनतेला वेठीस धरण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी सातवा वेतन आयोग द्यावा आणि इतर अनुषंगिक मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारच्या (ता.16) मध्यरात्रीपासून संप सुरू केला आहे. त्यामुळे राज्यात सगळ्या बसस्थानकावर शुकशुकाट आहे. राज्य परिवहन महमंडळाच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाश्यांचे अतोनात हाल झालेले पहावयास मिळत आहे. दूर अंतरावर जाणा-या  व येणा-यांना आपला प्रवासाचा बेत रद्द करावा लागला आहे तर काही ठिकाणी गैरसोय होवु नये म्हणुन आरटीओ कार्यालय आणि पोलिसांनी पर्यायी व्यवस्था म्हणुन खासगी वाहनांतुन प्रवाशांच्या प्रवासाची सोय केल्याचेही दिसून आले. 

चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांना संपाचा फटका
​एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नातेवाईकांनाही बसला आहे. कर्नाटकातून पुण्याला जाणाऱ्या नातेवाईकांना कागल मध्येच एसटी कर्मचाऱ्यांनी खाली उतरवले त्यानंतर पाटील यांनी आपल्या चालकाच्या मदतीने त्यांना कोल्हापुरात आणून पुढे पुण्याला पाठवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com