सोलपूर - कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

बाबासाहेब शिंदे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

पांगरी (सोलापूर) : कर्जास कंटाळून एका जेष्ठ शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (ता. 25) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास नारी (ता.बार्शी) येथे उघडकीस आली. सौदागर भानुदास डोईफोडे (वय 60 रा. नारी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत बालाजी हनुमंत क्षीरसागर (वय 26 रा.नारी) यांनी पांगरी पोलीसात माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, सौदागर भानुदास क्षीरसागर हे मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी गेले होते. सकाळी न आल्याने शोध घेतला असता शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर बॅंकेचे कर्ज असल्याने तणावाखाली वावरत होते. हे कर्ज कसे फेडावयाचे या तणावाखाली राहून कर्जास कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे.   

Web Title: farmer suicide due to cant repay the loan