संप मिटल्याने दूध संकलन, वाहतूक सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

पंढरपूर : शेतकरी नेत्यांनी संप मागे घेतल्यानंतर आज सकाळी पंढरपूर तालुक्‍यातील अनेक गावांत दोन दिवसांपासून बंद असलेले दूध संकलन व वाहतूक सुरू झाली. दरम्यान, संपाबाबत शेतकरी नेत्यांमध्ये फूट पडल्यानंतर पुळूज, वाखरी भागातील शेतकऱ्यांनी संप कायम सुरू ठेवणार असल्याचा निर्धार व्यक्त करत सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गादेगाव फाटा येथे टेंपो अडवून पपईची नासधूस केली. 

गेल्या दोन दिवसांपासून तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात संप पुकारला आहे. शहराकडे जाणारे दूध व भाजीपाला रोखल्याने बाजार ओस पडल्याचा दिसून आला. शुक्रवारी (ता. 2) येथील बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक थांबल्याने व्यवहार ठप्प झाले होते. संप मागे घेतल्याची माहिती विविध माध्यमांद्वारे समजल्यानंतर सकाळपासून तालुक्‍यातील सर्रास गावांमध्ये दूध संकलन व वाहतूक सुरू झाली. शासन जोपर्यंत दिलेल्या आश्‍वासनांची अंमलबजावणी करत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा ठाम पवित्रा बळिराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर यांनी घेतला आहे. संप सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

'शेतकरी संपा'विषयी अधिक बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

बळिराजा शेतकरी संघटनेच्या या पवित्र्यानंतर पंढरपूर, माढा तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. वाखरी येथील शेतकऱ्यांनी गाव बंद ठेवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. पुळूज येथील शेतकऱ्यांनी आजचा आठवडे बाजार रद्द करून गाव बंद ठेवले.

पश्चिम महाराष्ट्र

औंध -  महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कुलस्वामिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी...

12.30 AM

सोलापूर -  रूपाभवानी मंदिरात गुरुवार (ता. 21) पासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे....

12.21 AM

रत्नागिरी - सर्वपित्रीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या वादळी वारा व मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सर्वाधिक पाऊस संगमेश्‍...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017