दोन कारखाने खाक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

बेळगाव - कणबर्गीतील ऑटोनगर औद्योगिक वसाहतीत "पॅकिंग टेप'ची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांना भीषण आग लागून सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळातील बेळगाव परिसरातील ही सर्वांत मोठी हानी मानली जात आहे. तब्बल 8 बंबांनी आग विझवण्याचे प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. शार्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

बेळगाव - कणबर्गीतील ऑटोनगर औद्योगिक वसाहतीत "पॅकिंग टेप'ची निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांना भीषण आग लागून सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. अलीकडच्या काळातील बेळगाव परिसरातील ही सर्वांत मोठी हानी मानली जात आहे. तब्बल 8 बंबांनी आग विझवण्याचे प्रयत्न झाले, पण ते अपयशी ठरले. शार्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

ऑटोनगरमध्ये "ए-टेक' हा कारखाना महेंद्र जैन यांच्या मालकीचा होता, तर "स्टेर्लिंग टेप' हा कारखाना भूपेंद्र शहा यांच्या मालकीचा होता. बुधवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजता कारखान्याला आग लागली. वॉचमनला आग दिसताच त्याने कारखान्याचे व्यवस्थापक विजय पोरवाल यांना माहिती दिली. श्री. पोरवाल यांनी अग्निशामक दलाला कळवले; पण अग्निशामक बंब घटनास्थळी पोचेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग वाढलेली पाहून निपाणी, धारवाडहूनही बंब मागवण्यात आले. तब्बल 8 बंबांनी चार ते पाच फेऱ्या केल्या तरी आग आटोक्‍यात आली नाही. आगीत दोन्ही कारखान्यातील बॉक्‍स पॅकिंग टेप, फर्निचर, किंमती वस्तू, रसायन व छत जळून खाक झाले. 

माळमारुती पोलिसांना आगीची माहिती मिळाल्यानंतर तेही रात्रीचा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही आग नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत पोलिस, अग्निशामक कर्मचारी आणि कारखाना व्यवस्थापक थांबून होते. आगीची झळ कमी झाल्यानंतर शक्‍य तितके साहित्य बाहेर काढणे, हा उद्देश होता. मात्र, पहाटेपर्यंत आग धुमसत होती. गुरुवारी सायंकाळी उशिरापर्यंत आगीच्या झळा कारखान्यातून येत होत्या. 

घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत माळमारुती पोलिस ठाण्यात झाली नव्हती. याबाबत व्यवस्थापक विजय पोरवाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ""आग आज सायंकाळी उशिरापर्यंत धुमसत होती. आता भडका कमी झाल्यानंतर फिर्याद देण्यासाठी माळमारुती पोलिसांकडे जाणार आहे.'' 

धारवाडहूनही बंब 
दोन्ही कारखान्यांना लागलेली आग आटोक्‍यात आणण्यासाठी पहिल्यांदा बेळगावातील दोन अग्निशामक बंब धावले. पण ते अपुरे असल्याचे लक्षात येताच निपाणी, संकेश्वरचे बंब मागवण्यात आले. तेही अपुरे ठरले. शेवटी हुबळी आणि धारवाड येथूनही बंब मागविण्यात आले. एकूण 8 बंबांनी 40 फेऱ्या मारल्या. पण आग विझू शकली नाही. त्यावरून आगीची भीषणता लक्षात येते. 

पॅकिंग टेप किंवा टिस्को टेप 
मोठ्या आकाराच्या चिकटपट्टीला टिस्को टेप किंवा पॅकिंग टेप म्हणतात. ही चिकटपट्टी पॅकिंगसाठी वापरली जाते. ती आकाराने नेहमीच्या चिकटपट्टीपेक्षा मोठी आणि सामान्यपणे खाकी रंगाची असते. ही पट्टी तयार करण्यासाठी "पॉलिप्रोपिलीन' हे रसायन वापरले जाते. ते ज्वलनशील असते. 130 अंश सेल्सिअसला ते वितळते आणि 160 अंशाला जळते.

Web Title: fire in kanbarri