फूड फेस्टिव्हलसाठी मोजकेच स्टॉल शिल्लक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - "सकाळ'ने आयोजित केलेल्या कोल्हापूर फूड फेस्टिव्हलसाठी स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक असून इच्छुकांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन "सकाळ' परिवाराने केले आहे. 

सासने मैदानाजवळील महाराणी लॉन (किरण बंगल्याशेजारी) येथे 17 फेब्रुवारीपासून सलग चार दिवस हा खाद्ययात्रा महोत्सव रंगणार असून फूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ महोत्सवाचे मुख्य प्रायोजक तर यश बेकर्स - रावसाहेब वंदुरे ग्रुप सहप्रायोजक आहेत. न्यू गणेश कॅंटीन सर्व्हिसेस कॅंटीन पार्टनर आहे. सोलाईफ न्यूट्रिशन्स व सोया प्रॉडक्‍टस्‌ एनर्जी ड्रिंक पार्टनर आहे. 

कोल्हापुरी मटण, पांढरा-तांबडा रस्सा, झुणका-भाकर, दही-खरडा-भाकरीपासून ते तरुणाईला भुरळ घालणारी सर्व प्रकारची खाद्यसंस्कृती येथे अवतरणार आहे. त्याशिवाय विविध जाम-सूपपासून बिस्कीट, विविध सरबते, लोणची-पापड, मसाले, पॅकिंग राईस, फिश, खाद्यतेल, नमकिन्स, फिंगर चिप्स आणि मुखवासांपर्यंतची फूड प्रॉडक्‍टस्‌ही महोत्सवात उपलब्ध असतील. 

- हिरा ग्रुपविषयी... 
हिरा ग्रुप ऑफ कंपनीज्‌ एफएमसीजी क्षेत्रातील एक नामांकित नाव आहे. हिरा रोलर आणि फ्लोअर मिल, पान मसाला, शिक्षण तसेच कन्स्ट्रक्‍शन क्षेत्रात जगभरातही या कंपनीची ख्याती आहे. विविध क्षेत्रांत विस्तारताना कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

- यश बेकर्सविषयी... 
बेकरी प्रॉडक्‍टस्‌ क्षेत्रातील पश्‍चिम महाराष्ट्रातील आयएसओ मानांकित ही कंपनी असून खारी, नानकटाई, कोकोनट बिस्किटस्‌, व्हेजिटेरियन केक, नॉन व्हेजिटेरियन केक, रस्क टोस्ट, कोकोनट कुकीज्‌ आदी प्रॉडक्‍टस्‌ना मोठी मागणी आहे. "इट यश - गेट यश' हे कंपनीचे ब्रीद आहे. 

- सोलाईफ विषयी 
चेप्रिओ फूडस्‌ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सोयाबीनपासून प्रक्रियायुक्त "सोलाईफ' सोयामिल्क प्रॉडक्‍टस्‌ हे भारतीय आहार पद्धतीचा अविभाज्य भाग बनावा, या उद्देशाने उत्पादित केली आहेत. सोया फ्लेवर दूध, पनीर, नमकीन, शेव व बुंदी आदी उत्पादनांना मोठी मागणी आहे. 

अधिक माहितीसाठी... 
खवय्यांबरोबरच आपले प्रॉडक्‍ट अधिकाधिक कोल्हापूरकरांपर्यंत पोचवण्यासाठी विविध फूड कंपन्यांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे. चला, तर मग आजच स्टॉल बुकिंग करूया. अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज-9922551918, संतोष - 9975513951.

Web Title: food festival in kolhapur