निसर्गरम्य परिसराला वणव्यांचे आव्हान

सुनील कांबळे
बुधवार, 18 एप्रिल 2018

पाचगणी - समुद्रसपाटीपासून चार हजार ३७८ फूट उंचीवर वसलेल्या येथील निसर्गरम्य परिसरासमोर वणव्यांच्या धगधगत्या ज्वालांचे आव्हान उभे राहिले आहे. दुर्मिळ वनौषधींचा नैसर्गिक खजिना, जीवित प्राणी आगीचे लक्ष्य ठरताहेत. दर वर्षी रात्री उशिरा दृष्टिक्षेपात येणारे वणवे आता भरदिवसाही दिसू लागले असून, वणव्यांचे लोण आता शहरी अन्‌ मानवी वसाहतीपर्यंत पसरू लागले आहे.

वर्षाऋतूनंतर हिरवळीचा शृंगार केलेल्या डोंगररांगा वाढत्या उष्म्यामुळे सुवर्ण तण असलेला पेहरावाचा साज करतात. मात्र, काही दिवसातच या डोंगररांगांत वणवे लागण्याचे सत्र सुरू होते. सर्व परिसर काळाकुट्ट होतो. डोंगररांगांत लागणारा वणवा मनुष्यामुळे किंवा नैसर्गिकरीत्या लागतो. वणव्यामुळे जमीन सुपीक होईल, जमिनीतील असलेले कीटक, प्राण्यांबाबत असलेले समज- गैरसमज अथवा बेपर्वाईमुळे आग लावली जाते, तर काही वेळा झाडांच्या घर्षणामुळे तर काही वेळा जनावरांच्या पायाच्या खुरांचे दगडांशी झालेल्या घर्षणामुळे नैसर्गिकरीत्या आग लागते. 

प्रबोधन, वन समित्यांची निर्मिती, वनसंरक्षण कायदे, अधिकाऱ्यांसह शहरी नागरिक, सेवाभावी संस्था, पर्यावरणवादी, निसर्गप्रेमी, वन समित्यांच्या बैठका आदी माध्यमातून वणवे रोखता येतील, असे निसर्गप्रेमींचे म्हणणे आहे. वणवे लावण्यापूर्वी ऋतुमानानुसार वन अधिकाऱ्यांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. एकूण क्षेत्र लक्षात घेता वनपाल, रक्षक कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे वणव्यांची समस्या उद्‌भवते. एकाच वनपाल रक्षकाकडे अनेक गावे नेमलेली असल्यामुळे त्यांना वनांचे रक्षण करणे अवघड होत असल्याचेही दिसते. वणव्याला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वनसंरक्षक पट्टे असल्यास वणव्याला आवर बसू शकतो. वणव्यांचे सत्र सुरू 
होण्यापूर्वी गावोगावी प्रबोधन करण्याकरिता अधिक व्यापक पावले उचलली पाहिजेत.

‘वणवामुक्त’साठी प्रोत्साहन देणे गरजेचे
गावोगावच्या वन समित्या अधिक सक्षम करण्याची आवश्‍यकता आहे. ‘तंटामुक्ती’प्रमाणे गावांना ‘वणवामुक्त’ होण्याकरिता प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचा निसर्गप्रेमींचा सूर आहे.

Web Title: forest fire loss

टॅग्स