फुक्कट ‘वाय-फाय’ची तरुणांत क्रेझ

लुमाकांत नलवडे
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मंडळाजवळ, कॉलेज, जिम परिसरात, मॉलशेजारी एवढंच काय, तर बाॅम्बे वडापाव गाडीजवळ तरुणांची गर्दी दिसते. तरीही ते एकमेकांशी बोलत नाहीत. फक्त मोबाइल हॅंडसेटमध्येच त्यांची नजर भिरभिरत असते. कारण काय माहिती आहे... तेथे ‘वाय-फाय’ने नेट कनेक्‍ट होते. फुक्कट वाय-फायची तरुणाईतील ही नवी क्रेझ वाढत आहे.

कोल्हापूर - मंडळाजवळ, कॉलेज, जिम परिसरात, मॉलशेजारी एवढंच काय, तर बाॅम्बे वडापाव गाडीजवळ तरुणांची गर्दी दिसते. तरीही ते एकमेकांशी बोलत नाहीत. फक्त मोबाइल हॅंडसेटमध्येच त्यांची नजर भिरभिरत असते. कारण काय माहिती आहे... तेथे ‘वाय-फाय’ने नेट कनेक्‍ट होते. फुक्कट वाय-फायची तरुणाईतील ही नवी क्रेझ वाढत आहे.

संपूर्ण मुंबई वाय-फाय होणार, असे मुख्यमंत्री वारंवार बोलत आहेत. डिजिटल क्रांती करण्याचे भाजप सरकारचे स्वप्न आहे. त्याची ही मुहूर्तमेढ आहे. कोल्हापूरच्या जवळच असलेले इस्लामपूर शहर राज्यातील पहिले ‘वाय-फाय’ शहर म्हणून नोंद झाले आहे; मात्र आजही कोल्हापुरात जेथे वाय-फाय तेथे उभे राहावे लागते. शहरातील अनेक तरुणांकडे इंटरनेट पॅक मारण्याइतकेही पैसे नसतात. त्याचाच हा परिणाम आहे. एवढंच नव्हे तर काहींना चंगळवाद म्हणूनही याचा वापर होतो. ‘अनलिमिटेड डाउनलोड’ काय असते हे वाय-फाय कनेक्‍टिव्हिटीच्या ठिकाणी दिसून येते. विशेष करून कॉलेजकुमारांत याची मोठी क्रेझ आहे. मुंबईत लोकलची माहिती ज्याप्रमाणे सर्वांना पाठ असते त्याचप्रमाणे कोल्हापुरातील तरुणांना मोफत वाय-फाय कनेक्‍टिव्हिटीची ठिकाणे माहिती आहेत.कसबा बावड्यात एका तरुण मंडळाजवळ, काही कॉलेज कॅम्पसमध्ये, ताराबाई पार्क येथील एका जिमजवळ, भवानी मंडपातील काही ठिकाणी, हायफाय हॉटेलच्या परिसरात आणि खासबाग मैदानाजवळील बाॅम्बे वडापावच्या गाडीजवळ अशी शहरातील काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. बाॅम्बे वडापावच्या गाडीवर तर ‘वडापाव’वर ‘वाय-फाय’ फ्री अशी जाहिरात केली आहे.

काही ठिकाणी पासवर्डच नसतो 
एखाद्या ठिकाणी तुम्ही उभे राहिला आणि मोबाइल हॅंडसेटमधील ‘वाय-फाय’ मोड सुरू असेल तर तुम्हाला एसएमएस येतो. त्यामध्ये पासवर्डसाठी क्रमांक असतो. त्याआधारे तुम्हीही तेथील वायफाय सुविधा अर्थात फुक्‍कट इंटरनेट कनेक्‍शन वापरू शकता. काही ठिकाणी वाय-फाय कनेक्‍शनला पासवर्डच नसतो. त्याची कनेक्‍टिव्हिटी तातडीने तुम्हाला मिळते.

पोलिस ठाण्याचा परिसरसुद्धा वाय-फाय
जिल्ह्यातील बहुतांशी पोलिस ठाणे आणि इतर कार्यालयांत सुद्धा ‘वाय-फाय’ सुविधा पुरविली आहे. त्यामुळे काही जणांकडून पोलिस ठाण्याच्या निमित्ताने त्या परिसरात थांबून त्याचा वापर केला जात होता. अर्थात तेव्हा वाय-फाय यंत्रणेची चाचणी सुरू होती. आता मात्र तेथे पासवर्ड दिल्याने सर्वसामान्यांना त्याचा उपयोग होत नाही.

टॅग्स