राजकीय स्पर्धेतही टिकून आहे मैत्रीचे नाते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 ऑगस्ट 2016

समन्वयाने टाळता येतो संघर्ष, जिल्‍ह्याच्‍या राजकारणात पक्षांतर्गत मैत्रीची अनेक उदाहरणे

सोलापूर - राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नाही आणि मित्रही नाही, ही राजकारणाची आणि राजकारण्यांची ओळख सांगणारी जुनी म्हण प्रचलित आहे. राजकारणाचे संदर्भ बदलले की मित्र आणि शत्रूही बदलतात. परंतु, योग्य समन्वय आणि मैत्रीचा आदर यामुळे जिल्ह्यातील राजकीय मैत्रीची काही उदाहरणे अद्यापही टिकून आहेत. 

जिल्ह्याच्या व राज्याच्या राजकारणात पक्षांतर्गत मैत्रीची अनेक उदाहरणे मिळतात. परंतु, स्वतंत्र पक्षात काम करून उच्च पदावर पोचल्यानंतरही मैत्रीचे नाते कायम ठेवणारी जोडगोळी म्हणून राज्याच्या राजकारणात माजी मंत्री शरद पवार व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, (कै.) विलासराव देशमुख व (कै.) गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. मुंडे-देशमुख यांच्या मैत्रीचे अनेकजण अनेकवेळा आजही दाखले देतात. सोलापूर जिल्ह्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार दिलीप सोपल यांच्या मैत्रीचा गोतावळा राज्यभर पसरलेला आहे.

खासदार मोहिते-पाटील

जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाचे अनेक वर्षे नेतृत्व केले. त्यातून त्यांना काही शिष्य तर काही मित्र मिळाले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात मोहिते-पाटलांना मानणारा सर्वपक्षीय स्वतंत्र गट त्यांनी यापूर्वीच तयार केला आहे.

शरद पवार-सुशीलकुमार शिंदे

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार व माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मैत्रीचा प्रत्यय वारंवार सर्वांनी घेतला आहे. २००९च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मित्रांनी लोकसभेत एकाच जिल्ह्यातून प्रतिनिधित्व केले होते. निवडणुका असोत की घरगुती कार्यक्रम, या दोन्ही प्रसंगी हे दोन मित्र सर्व भेदभाव बाजूला ठेवून एकत्र येतात. 

प्रशांत परिचारक-संजय शिंदे

आमदार प्रशांत परिचारक व जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांची मैत्री देखील जिल्ह्याने वारंवार अनुभवली आहे. विधानपरिषद निवडणूक असो की जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड, या दोघांमध्ये असलेल्या समन्वयामुळे त्यांनी विरोधकांच्या सर्व शक्‍यता धुडकावून लावल्या आहेत. शिवसेनेचे समाधान आवताडे व राजेंद्र राऊत, स्वाभिमानीचे उत्तम जानकर, काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासोबत आमदार परिचारक व संजय शिंदे यांचा असलेला दोस्ताना सर्वांनी पाहिला आहे.