फुलेवाडी-रिंगरोडच्या कामास अखेर मिळाला मुहूर्त - सतेज पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

कोल्हापूर - गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या फुलेवाडी-रिंगरोडच्या कामास आज आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला. नगरसेवक राहुल  माने यांच्या पुढाकाराने हे काम सुरू झाले आहे.

फुलेवाडी-रिंगरोडचे काम नगरोत्थान योजनेमधून मंजूर झाले आहे. या रोडवरील पाणी गळती तसेच काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेचे काम आदी कारणांमुळे सात वर्षांपासून काम रखडले होते. रस्त्यावर केवळ खडी पसरून ठेवल्याने त्याचा लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अखेर आज या मार्गाच्या कामास सुरवात झाली.

नगरसेवक राहुल माने म्हणाले, ‘‘निवडून आल्यापासून सातत्याने रिंगरोडच्या कामाचा महापालिकेत पाठपुरावा केला. आयुक्तांबरोबर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रोडसंदर्भातील अडचणी दूर केल्या. रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.’’ रास्ता रोको करून व निवेदने देऊन प्रसिद्धीच्या मागे न लागता वर्षभर या कामासाठी पाठपुरावा केला.आज प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्याचे समाधान आहे.
काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, ‘‘भगवा चौकापर्यंत होणाऱ्या या रस्त्याच्या कामासाठी नगरसेवक राहुल माने यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे ३५ लाख रुपये वाढीव निधी मंजूर झाला.’’

आमदार पाटील, नगरसेविका इंदुमती माने व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामास सुरवात झाली.

उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, तौफिक मुलाणी, माजी नगरसेवक सचिन खेडकर, इंद्रजित बोंद्रे, शिवानंद बनछोडे, अभिजित देठे, अमर पाटील, मंगेश गुरव, प्रा. वसंतराव मोरे, साक्षी पन्हाळकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, एस. के. माने आदी उपस्थित होते. किरण पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेंद्र अपराध यांनी आभार मानले.

Web Title: fulewadi-ringroad work muhurt