चंदन वंदनचे रूप पालटणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

कऱ्हाड - राज्य शासनाने राज्यातील आठ पर्यंटन स्थळांसाठी इको टुरिझम योजनेंतर्गत सुमारे आठ कोटी 35 लाख 28 हजारांचा निधी मंजूर केला आहेत. त्यात चंदन वंदन (ता. कोरेगाव) पर्यटनस्थळाचा समावेश आहे. या पर्यटन स्थळातील सुमारे अडीच हेक्‍टर संचित क्षेत्र रोपवनखाली आणण्यासह विविध कामांसाठी सुमारे एक कोटी 27 लाख 50 हजारांचा निधी आहे. या निधीतून पर्यटन स्थळावरील वेगवेगळ्या कामांना गती मिळेल. 

कऱ्हाड - राज्य शासनाने राज्यातील आठ पर्यंटन स्थळांसाठी इको टुरिझम योजनेंतर्गत सुमारे आठ कोटी 35 लाख 28 हजारांचा निधी मंजूर केला आहेत. त्यात चंदन वंदन (ता. कोरेगाव) पर्यटनस्थळाचा समावेश आहे. या पर्यटन स्थळातील सुमारे अडीच हेक्‍टर संचित क्षेत्र रोपवनखाली आणण्यासह विविध कामांसाठी सुमारे एक कोटी 27 लाख 50 हजारांचा निधी आहे. या निधीतून पर्यटन स्थळावरील वेगवेगळ्या कामांना गती मिळेल. 

शासनाने पुणे, नाशिक, धुळे, औरंगाबाद, कोल्हापूर व गडचिरोली क्षेत्रातील आठ पर्यटनस्थळांसाठी निधी मंजूर केला आहे. त्यात चंदन वंदन हे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर झाले आहे. या परिसरात वेगवेगळी विकासकामे करण्यासाठी प्रामुख्याने निधीचा वापर करण्याचे निर्देश शासनाने दिलेत. त्यात सिंचन रोपवनचे मुख्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या भागातील अडीच हेक्‍टर जमिनीत हा प्रकल्प राबवण्याचे काम शासन करणार आहे. पथावरील पायऱ्या, बायोडायजिस्ट स्वच्छतागृह, पॅगोडा, पाण्याची टाकी, पाइपलाइन, कूपनलिका निरीक्षक टॉवर, प्राण्यांसाठी जलकुंड, झाडांसाठी कट्टे अशा विविध कामांचाही त्यात समावेश आहे. शासनाच्या इको टुरिझम योजनेंतर्गत निधी देण्यात येणार आहे. 

चंदन वंदनला होणारी कामे 
पायवाट- 11 लाख 49 हजार, दहा सौरपथदिवे- अडीच लाख, सहा बायोडायजेस्ट स्वच्छतागृह- पाच लाख, पथावरील पायऱ्या- 16 लाख 68 हजार, निरीक्षण मनोरा- सात लाख 33 हजार, दोन लोखंडी व लाकडी कलवर्ट- प्रत्येकी सहा लाख 48 हजार, प्राण्यांसाठी पाच निसर्गस्नेही जलकुंड- अडीच लाख, झाडांसाठी चिरे दगडातील 15 कट्टे- दोन लाख, फॅब्रिकेटस दहा बेंच बसविणे- तीन लाख, आठ कचराकुंड्या- एक लाख, चित्ररूप माहिती व त्याचे फलक- 16 लाख 58 हजार, सिंचिती रोपवन (अडीच एकर)- 15 लाख 18 हजार, फेरोक्रेट पॅगोडा (तीन)- प्रत्येकी तीन लाख 89 हजार, फॅब्रिकोट पॅगोडा (तीन) प्रत्येकी- दोन लाख 25 हजार, स्वागत कमान- चार लाख 26 हजार, पाण्याची टाकी, पाइपलाइन व कूपनलिका- दहा लाख 37 हजार, मजूर कुटी बांधणे- चार लाख 40 हजार. 

पर्यटन स्थळांसाठी मंजूर निधी 
- चंदन वंदन- एक कोटी 27 लाख 50 हजार, 
- खुडू (सोलापूर)- 17 लाख 84 लाख 
- पिंपळगाव उद्यान (पुणे)- 70 लाख 34 हजार 
- येडूआई देवस्थान (नगर)- एक कोटी 11 लाख 84 हजार, 
- ममदापूर येथील राखीव क्षेत्र (नाशिक)- तीन कोटी 67 लाख 22 हजार 
- तोरणमाळ (धुळे)- 25 लाख, 
- अंजिठा वन उद्यान (औरंगाबाद)- 32 लाख 
- वर्धम पार्क (गडचिरोली)- 83 लाख 75 हजार 

Web Title: Funds approved for tourist place