वर्षारंभी झटकली मरगळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल - दोन हजार दुचाकी रस्त्यावर

सांगली - महागाईचा वाढता डोंगर आणि मंदीचे सावट यामुळे स्थानिक बाजारपेठांना गेल्या वर्षभरात मरगळ आली होती. मराठी वर्षारंभाचा मुहूर्त साधत सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली असून व्यापारी समाधान व्यक्त करीत आहेत. पाडव्यानिमित्त विविध कंपन्यांच्या तब्बल दोन हजार दुचाकींची विक्री झाली. सोने-चांदीचीही चार कोटींची विक्री झाली. विविध ऑफर्सचा लाभ घेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचीही चांगली विक्री झाली. 

बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल - दोन हजार दुचाकी रस्त्यावर

सांगली - महागाईचा वाढता डोंगर आणि मंदीचे सावट यामुळे स्थानिक बाजारपेठांना गेल्या वर्षभरात मरगळ आली होती. मराठी वर्षारंभाचा मुहूर्त साधत सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली असून व्यापारी समाधान व्यक्त करीत आहेत. पाडव्यानिमित्त विविध कंपन्यांच्या तब्बल दोन हजार दुचाकींची विक्री झाली. सोने-चांदीचीही चार कोटींची विक्री झाली. विविध ऑफर्सचा लाभ घेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंचीही चांगली विक्री झाली. 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणार गुढीपाडवा. याच दिवशी मराठी वर्षाला प्रारंभ होतो. हा सुवर्ण योग साधून खरेदी केली जाते. दोन-तीन वर्षांत मंदीमुळे फारसा प्रतिसाद नव्हता. यंदा प्रचंड प्रतिसाद खरेदीदारांनी दिल्याचे व्यापऱ्यांनी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त आठवड्यापासून बाजारपेठेत लगबग होती. गुढीसाठीचे बांबू, साखरेच्या माळा, फुलांनी बाजारपेठ सजली होती. पारंपरिक पद्धतीने आज घरोघरी गुढीपाडवा झाला. उन्हाच्या तडाख्यामुळे सकाळी, सायंकाळी सांगलीकरांनी मनसोक्त खरेदी केली. मार्च एंडिंगची धांदल संपली असून, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला मोठी उलाढाल झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. 

दोन हजार दुचाकी 
हिरो, टीव्हीएस, बजाज, सुझुकीसह विविध कंपन्यांच्या दुचाकीला चांगली मागणी होती. हिरो कंपनीच्या स्प्लेंडर, पॅशन, मायस्ट्रो, प्लेझर आदी गाड्यांना मोठी मागणी होती. कोणतीही ऑफर नसताना हिरो कंपनीच्या तब्बल एक हजार दुचाकींची विक्री झाली. तर दुसऱ्या बाजूला टीव्हीएस कंपनीच्या विविध गाड्यांना मोठी मागणी होती. तेथेही ८०० दुचाकींची विक्री झाली. त्यातील एक्‍सएल-१०० या दुचाकीला ग्रामीण भागातून मोठी मागणी होती. तरुणाईत क्रेझ असणाऱ्या बुलेटच्या खरेदीसाठीही अनेकांना वेटिंग करावे लागले.  शोरूममध्ये सकाळपासून मोठी गर्दी होती. 

तीनशेवर चारचाकी 
मूल्यवर्धीत कर कमी झाल्याने चारचाकी विश्‍वातही मोठी उलाढाल झाली. मारुती सुझुकी, निसान, हुंडाई, वोल्स वॅगनसह विविध कंपन्यांच्या तीनशेवर चारचाकींची  विक्री झाली. मारुती सुझुकीच्या अल्टो, सियाझ, स्वीफ्ट आदी गाड्यांना अधिक मागणी होती. तसेच होंडा सिटी, बलेनो, क्रेटा आदी गाड्यांना पसंती होती. 

इलेक्‍टॉनिक्‍स्‌च्या शॉपिंग उत्साहात 
पाडव्यानिमित्त इलेक्‍ट्रॉनिक्‍स दुकाने, मोबाइल शॉपीमधील उत्साहाला उधाण आले. विविध ऑफर्स जाहीर करत खरेदीदारांना वळवण्याकडे स्पर्धा होती. एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलर, एसीसह विविध इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणांची कोट्यवधींची विक्री झाली. सांगलीतील सर्वच दुकांनात सकाळपासून मोठी गर्दी होती. खरेदीदारांनी विविध ऑफर्सचा लाभ घेतला. तसेच मोबाईलचीही लाखोंची विक्री झाली. सॅमसंग, मायक्रोमॅक्‍स, कार्बन, ॲपल, नोकीयासह विविध कंपन्यांच्या मोबाइलला पसंती होती.  स्मार्ट फोन्स्‌ खरेदीसाठी तरुणाईचा उत्साह होता. 

सोने-चांदीला झळाली 

गेल्यावर्षी पाडव्याला सोने-चांदीची बाजरपेठ बंद होती. यंदा मात्र मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल चार कोटींपेक्षा अधिक सोने-चांदीची विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. मुहूर्ताला खरेदी करणाऱ्यांची सकाळपासून गर्दी होती. बहुतांश जणांनी गुंतवणुकीसाठी सोन्याच्या वळांची खरेदी केली. तर काहींनी चांदीच्या वस्तूही खरेदी केल्या. यंदा विशेष म्हणजे चांदीचे लहान गुढ्यांचे कलशही विक्रीसाठी ठेवले होती.  जागेअभावी या गुढ्या पुजून उत्सव करण्यावर अनेक ठिकाणी भर दिला.

रियलइस्टेटला अच्छे दिन
मरगळलेल्या रियलइस्टेट क्षेत्रालाही यंदा अच्छे दिन  आले आहेत. पाडव्यानिमित्त अनेकांनी फ्लॅट, रो  हाऊसचे बुकिंग केले. विविध ऑफर्स आणि सोयीसुविधांचा लाभ घेत अनेकांनी आज स्वप्नातलं घर मिळवले. त्यामुळे सर्वत्र आनंद होता.

 

Web Title: gold purchasing padva muhurt