शासन योजना पोचविण्यासाठी माध्यमांचा वापर करा - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

सांगली - शासनाच्या योजना, महत्त्वाकांक्षी निर्णय जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रिंट मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाबरोबरच सोशल मीडियाचाही आपल्या कामकाजात प्रभावी वापर करावा, अशा सूचना माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केल्या. त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

सांगली - शासनाच्या योजना, महत्त्वाकांक्षी निर्णय जनसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने प्रिंट मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाबरोबरच सोशल मीडियाचाही आपल्या कामकाजात प्रभावी वापर करावा, अशा सूचना माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी येथे केल्या. त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय, सांगली कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. भुजबळ म्हणाले, ‘‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे शासन व जनता यामधील महत्त्वाचा दुवा असून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, निर्णय त्वरित जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय हे महान्यूज वेब पोर्टल, मासिक लोकराज्य, दिलखुलास, जय महाराष्ट्र, प्रिंट मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक मीडिया या माध्यमातून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. या सर्व माध्यमांचा जिल्हा माहिती कार्यालयाने प्रभावी वापर करावा. संप्रदा बीडकर यांनी कार्यालयाचे कामकाज व राबवण्यात येत असलेल्या सांगली ब्रॅंडिंग दिनदर्शिका, पर्यटन नकाशा, मुद्रा बॅंक योजना, सर्वसाधारण, विशेष घटक योजना प्रसिद्धी आदी उपक्रमांची माहिती दिली.