जिल्ह्यातील ५५० ग्रामसभांचा कारभार कोरमवरच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

सांगली - राज्य शासनाने २ ऑक्‍टोबरच्या ग्रामसभा बहुमतात घेण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यातील ६९९ पैकी ५५० गावांत सभा झाल्या. १४९ गावांतील ग्रामसभा तहकूब करण्यात आल्या आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे बहुमतात ग्रामसभा ऐवजी केवळ कोरमवर ग्रामसभा झाल्याचे स्पष्ट होत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामसभेत मराठा आरक्षणाचे ठराव झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

देशातील शहरांना स्मार्ट बनविले जात असून, गावांचाही सर्वांगीण विकास व्हावा, म्हणून थेट ग्रामपंचायतींना निधी वर्ग केला जात आहे. निधीच्या विनियोगाचे अधिकार ग्रामस्थांना दिले आहेत. वर्षभरात सहा ग्रामसभा होतात. २ ऑक्‍टोबरच्या ग्रामसभेला विशेष महत्त्व होते. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा कशा पद्धतीने होतात, याकडे सरकारने लक्ष घातले असून याची माहितीही तत्काळ सरकारला कळवावी, असे आदेश दिले आहेत. 

तालुकानिहाय तहकूब ग्रामसभा अशा- तासगाव-९, जत-३३, मिरज- १७, वाळवा-१३, कवठेमहांकाळ-३१, शिराळा-१२, पलूस-४, कडेगाव-२०, खानापूर-४ व आटपाडी-६.

अंगणवाड्यांत निकृष्ट पोषण आहार
तासगाव तालुक्‍यातील अंगणवाड्यांतील बालकांना निकृष्ट पोषण आहार मिळत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आली. प्रवीण शिंदे, किशोर सरवदे, धनाजी पवार यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Gramasabhanca management on coram