सोलापूर - सिंहगड कॉलेजमध्ये कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती 

helmet
helmet

सोलापूर : पुणे रस्त्यावरील सिंहगड कॉलेजने सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन सिंहगड कॉलेजची टीम वाहतूक सुरक्षेसंबंधी प्रबोधनाचे कार्यक्रम करीत असते. इतरांना वाहतुकीचे नियम सांगताना स्वत:पासून सुरवात केल्याने सिंहगड कॉलेज प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. 

काही दिवसांपूर्वी कॉलेजच्या एका कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. हेल्मेट असते तर कर्मचाऱ्याचा जीव वाचू शकला असता. कॉलेजच्या सुट्यानंतर प्राचार्य डॉ. शंकर नवले आणि प्रशासनाने वाहतूक सुरक्षेचा विचार करून कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी प्राचार्य डॉ. शंकर नवले, डीन ऍडमिनिस्ट्रेशन प्रा. कुलकर्णी, डीन ऍकॅडमिक प्रा. अभय काळजे व मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. अझहर शेख या सर्वांनी हेल्मेट परिधान केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन केले. पहिल्या टप्प्यात 10 जुलैपासून सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. लवकरच विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट सक्ती विचाराधीन असल्याचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले. 

दोन महिन्यांपूर्वी आमच्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. आमचे अनेक कर्मचारी महामार्गावरून कॉलेजला येतात. सुरक्षित वाहन चालविले तरी समोरच्या किंवा मागून येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. हेल्मेट असेल तर डोक्‍याला दुखापत होणार नाही. सर्वांच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हेल्मेट सक्ती केली आहे. 
- डॉ. शंकर नवले, प्राचार्य, सिंहगड कॉलेज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com